महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Parliament Budget Session : मोदींच्या एका मित्राची संपत्ती अडीच वर्षात १३ पटींनी वाढली - मल्लिकार्जुन खरगे - मल्लिकार्जुन खरगे यांचे राज्यसभेत उत्तर

राज्यसभेत विरोधी पक्षनेते आणि कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सरकारवर टीका करताना म्हटले, 'तुम्ही जनतेची लूट करत आहात. आम्ही हे सांगण्याचा प्रयत्न केला तर आमचा आवाज दाबला जातो'.

Mallikarjun Kharge
मल्लीकार्जुन खरगे

By

Published : Feb 8, 2023, 12:02 PM IST

Updated : Feb 8, 2023, 1:02 PM IST

नवी दिल्ली: राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सरकारवर जोरदार टीका करत सरकारच्या कार्यपद्धतीचे वाभाडे काढले आहे. सरकारचे मंत्री आणि नेते जात, धर्म, पेहराव यांच्या नावाखाली देशात द्वेश पसरवत आहेत, असे खरगे म्हणाले. उपराष्ट्रपती धनखर यांनी खरगे यांना त्यांच्या या वक्तव्यावरुन खडसावले. त्यानंतर सदनात गदारोळ सुरू झाला. खरगेंनी याला प्रत्युतर देताना, आता आपण मला बोलावे कसे तेही शिकवणार का, असा सवाल केला. 'मै ना खाऊंगा ना खाने दूंगा', असे म्हणणारे काही उद्योजकांना का खाऊ घालत आहेत, असे खरगे म्हणाले.

खरगे यांच्या भाषणानंतर राज्यसभेत मोठा गोंधळ झाला आहे. खरगे म्हणाले की, 2014 मध्ये पीएम मोदी म्हणाले 'ना खाऊंगा ना खाने दूंगा'. आता मला विचारायचे आहे की ते काही उद्योगपतींना 'खायला' का देत आहेत. पीएम मोदींच्या जवळच्या मित्रांपैकी एकाची संपत्ती 2.5 वर्षात 13 पटींनी वाढली. मला माहित नाही की त्यांची मालमत्ता केवळ दोन वर्षांत ₹ 12 लाख कोटींवर पोहोचली आहे.

दलितांना समान दर्जा का देत नाहीत:राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी दलितांबाबत वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, 'आम्ही अनुसूचित जातींना हिंदू मानतो, मग त्यांना मंदिरात जाण्यापासून का रोखण्यात येते. त्यांना समजत असेल तर त्यांना समान दर्जा का देत नाही. अनेक मंत्री त्यांच्या घरी जाऊन खाऊ दाखवतात आणि फोटो काढून सांगतात की, आम्ही त्यांच्या घरी जेवण केले आहे.

भाषणादरम्यान झाला गदारोळ: अनेक खासदार-मंत्री फक्त हिंदू-मुस्लिमच करतात, याशिवाय दुसरा मुद्दा नाही का? दुसरीकडे, काही अनुसूचित जातीचे लोक मंदिरात गेल्यावर त्यांना मारहाण केली जाते, त्यांचे ऐकले जात नाही. यावेळी ते म्हणाले की, देशात द्वेषाचे वातावरण निर्माण केले जात आहे. त्यांच्या भाषणादरम्यान गदारोळ झाला. खरगे म्हणाले, 'पीएम मोदींच्या जवळच्या मित्रांपैकी एकाची संपत्ती अडीच वर्षांत 13 पट वाढली आहे. 2014 मध्ये ते 50,000 कोटी रुपये होते तर 2019 मध्ये ते 1 लाख कोटी रुपये झाले. अशी काय जादू झाली की अचानक दोन वर्षात 12 लाख कोटींची संपत्ती आली, ही मैत्रीची उपकार आहे का?

हेही वाचा : Parliament Budget Session : राहुल गांधी यांनी सभागृहाची दिशाभूल केली - रवी शंकर प्रसाद

Last Updated : Feb 8, 2023, 1:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details