महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Padma Shri Nanda Sir Passes Away : 104 वर्षीय पद्मश्री नंदा सरांचे निधन - कोरोना उपचारादरम्यान पद्मश्री नंदा सरांचे निधन

पद्मश्री नंदा सर यांचे वयाच्या १०४ व्या वर्षी निधन ( Padma Shri Nanda Sir Passes Away ) झाले आहे. त्यांच्यावर कोविड-19 चा उपचार सुरू होता. अलीकडेच त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

Padma Shri Nanda Sir Passes Away
104 वर्षीय पद्मश्री नंदा सरांचे निधन

By

Published : Dec 7, 2021, 6:36 PM IST

Updated : Dec 7, 2021, 7:16 PM IST

जाजपूर (ओडिशा) - पद्मश्री नंदा सर यांचे वयाच्या १०४ व्या वर्षी निधन ( Padma Shri Nanda Sir Passes Away ) झाले आहे. त्यांच्यावर कोविड-19 चा उपचार सुरू होता. अलीकडेच त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

पद्मश्री नंदा प्रस्टी यांचे वयाच्या १०४ व्या वर्षी भुवनेश्वरमधील एका खाजगी रुग्णालयात निधन झाले, त्यांचे नातू खगेश्वर प्रस्टी यांनी त्यांच्या निधनाबद्दल माहिती दिली आहे. 'नंदा सर' हे ओडिशाच्या रुग्णालयात उपचार घेत होते.

नंदा सरांची कारकिर्द -

‘नंदा सर’ या नावाने ओळखले जाणारे पद्मश्री नंदा किशोर प्रस्टी यांच्या निधनाने ओडिशात कधीही भरुन न निघणारी एक पोकळी निर्माण झाली आहे. जाजपूर जिल्ह्यातील सुकिंदा ब्लॉक अंतर्गत असलेल्या कांतिरा गावात ते शिक्षक होते. याच परिसरातून ते निरक्षरता निर्मूलनाचे काम करायचे, निःस्वार्थ समर्पणासाठी ते सर्वांचे प्रिय होते.

9 नोव्हेंबर रोजी, त्यांना शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल भारताच्या राष्ट्रपतींकडून प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्कार मिळाला. नंदा सर, जे इयत्ता 7 पास झाले होते, ते 70 वर्षांहून अधिक काळ त्यांच्या चतशली (प्राथमिक शिक्षणासाठी अनौपचारिक शाळा) येथे मुलांना तसेच मोठ्यांना शिकवत होते. शिवाय ते शिकवण्यासाठी एक पैसाही घेत नव्हते.

हे सर्व 1948 मध्ये सुरू झाले. प्रस्टी 7 च्या वर्गात उत्तीर्ण झाल्यामुळे, त्याच्या काकांनी त्याच्यासाठी कटकमध्ये नोकरीची व्यवस्था केली. मात्र, त्याचे वडील त्यांना शहरात पाठवण्यास तयार नव्हते. उच्च शिक्षण घेता न आल्याने प्रस्टीने वडिलांना शेतीच्या कामात मदत करण्याचा निर्णय घेतला.

शेतजमिनीवर काम केल्यानंतर, नंदा सरांनी आपल्या फावल्या वेळात गावातील मुलांना मोफत शिक्षण देण्यास सुरुवात केली. एक पाऊल पुढे जाऊन त्यांनी परिसरातील ज्येष्ठांनाही शिक्षण दिले.

हेही वाचा -Sharad Pawar Visits Suspended MPs : शरद पवार, जया बच्चन यांची खासदारांच्या धरणे आंदोलनाला भेट

Last Updated : Dec 7, 2021, 7:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details