पाटणा :कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसमोर देशातील वैद्यकीय व्यवस्था निकामी ठरताना दिसून येत आहे. त्यातच प्रशासनाचा निष्काळजीपणा कोरोनाच्या पथ्यावर पडतो आहे. बिहारच्या सुपौैल जिल्ह्यामध्ये एका रुग्णालयाचा असाच एक ढिसाळ कारभार समोर आला आहे. एका कोरोना रुग्णाने ऑक्सिजनची वाट पाहत रुग्णालयाच्या बाहेरच आपले प्राण सोडले. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या रुग्णाला ऑक्सिजन आणून लावला.
कोविड केंद्रावर नव्हता डॉक्टरांचा पत्ता..
मृताच्या नातेवाईकाने सांगितले, की रुग्णाची तब्येत ढासळल्यामुळे त्याला उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. याठिकाणी रुग्णाला सुरुवातीला कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी रुग्णाची ऑक्सिजन लेव्हल ६५ होती. जेव्हा या रुग्णाला कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले गेले, तेव्हा तिथे डॉक्टरही उपस्थित नव्हते. काही वेळानंतर जेव्हा डॉक्टर हजर झाले, तेव्हा रुग्णाची गंभीर परिस्थिती पाहून त्याला तातडीने दुसरीकडे हलवण्यास सांगण्यात आले. मात्र, ही प्रक्रिया सुरू असतानाच कोविड केंद्राच्या पायऱ्यांवरच या रुग्णाने अखेरचा श्वास घेतला.
रुग्ण स्वतःच सांगत होता ऑक्सिजन द्या..