नवी दिल्ली - कोरोच्या लशींचे डोस पुरेसे उपलब्ध नसल्याची राज्यांकडून तक्रार करण्यात येते. त्या पार्श्वभूमीवर केंद्राने लशींच्या उपलब्धतेची माहिती जाहीर केली आहे. राज्य, केंद्रशासित प्रदेश व खासगी रुग्णालयांकडे अद्याप १.६६ कोटी कोरोना लस उपलब्ध असल्याचे माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
राज्य व केंद्रशासित प्रदेशांना ३७.०७ कोटी लस ही विविध माध्यमांतून पुरविण्यात आली आहे. अजून २३,८०,००० लशींचे डोस देण्यात येणार आहेत. तर वाया गेलेल्या लशींसह वापर झालेल्या लशींचे एकूण प्रमाण हे ३५ कोटी ४० लाख ६० हजार १९७ असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. केंद्र सरकार हे देशभरात कोरोना लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी कटिबद्ध आहे. दरम्यान १८ वर्षांहून अधिक वयोगटातील सर्व व्यक्तींसाठी २१ जूनपासून लसीकरण करणाचा नवा टप्पा सुरू झाला आहे.
हेही वाचा-६ प्रयत्नांनंतर 'ती' एमपीएससी उत्तीर्ण झाली, मात्र अजूनही नियुक्तीच्या प्रतिक्षेत
भारताने लसीकरणात अमेरिकेला टाकले मागे-
कोरोना विरोधी लढाईत भारताने आघाडी घेतली आहे. एकीकडे करोनाचे नवीन रुग्ण कमी होत असताना दुसरीकडे लसीकरण मोहीम वेगात सुरू आहे. सर्वांत जास्त लसीकरण करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. लसीकरणाच्या बाबतीत अमेरिकेला भारताला मागे टाकले आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाची वाढ लक्षात घेता लसीकरणाच्या प्रक्रिया देखील वेगात सुरु असल्याचे पाहायला मिळते आहे.
हेही वाचा-फादर स्टॅन यांच्या मृत्यूनंतर संयुक्त राष्ट्राने भारत सरकारला 'ही' केली विनंती
दरम्यान, केंद्र सरकारने जूनमध्ये सर्वोच्च न्यायालयात सांगितले, की जुलैपर्यंत कोरोना लसीच्या एकूण ५१.६ कोटी डोस प्रदान केले जातील. त्यापैकी ३५.६ कोटी डोस उपलब्ध करण्यात आले आहेत
डेल्टा प्लस' व्हेरिएंटमुळे वाढली चिंता -
देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची धास्ती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या 'डेल्टा प्लस' व्हेरिएंटमुळे चिंता वाढली आहे. देशात आजपर्यंत 50 रुग्ण 'डेल्टा प्लस'चे आढळले आहेत. यातील सर्वांत जास्त रुग्ण हे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, केरळ आणि तामिळनाडू राज्यात आढळले आहेत.