महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Atik Ahmed Death News :युपीत अतिक अहमदच्या हत्येबरोबर कायद्याचीदेखील हत्या, विरोधकांचा योगी सरकावर निशाणा - UP politics over Atik Ahmed murder

शनिवारी रात्री प्रचंड पोलीस बंदोबस्त असतानादेखील अज्ञात हल्लेखोरांनी अतिक अहमदसह त्याच्या भावाची प्रयागराजमध्ये गोळ्या झाडून हत्या केली. यावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्यसभा खासदार कपिल सिब्बल म्हणाले की, राज्यात गुंडांसह कायदा आणि सुव्यवस्थेच्याही हत्या झाल्या आहेत.

अतिक अहमद
अतिक अहमद

By

Published : Apr 16, 2023, 8:38 AM IST

Updated : Apr 16, 2023, 1:05 PM IST

लखनौ: शनिवारी रात्री गॅंगस्टरपासून राजकारणी झालेला अतिक अहमद आणि त्याच्या भावाच्या हत्येने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. या हत्येचे व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरलदेखील होत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेसाठी विरोधकांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव म्हणाले की, राज्यात गुन्हेगारी कमालीची वाढलेले आहे. तर राज्यसभा खासदार कपिल सिब्बल म्हणाले की, राज्यात गुंडांसह कायदा आणि सुव्यवस्थेचीदेखील हत्या झाला आहे.

अखिलेश यादव यांनी ट्विट केले की, "उत्तर प्रदेशात गुन्हेगारीने कळस गाठला आहे. गुन्हेगारांचे मनोबल उंचावले जात आहे. पोलिसांची सुरक्षा असतानादेखील उघड-उघड गोळीबार करून एखाद्याला ठार करण्यात येते. तर सर्वसामान्यांच्या सुरक्षेचे काय विचारणार? जनतेमध्ये जाणीवपूर्वक भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे.

अराजकता शिगेला पोहोचल्याचे उदाहरण-अमरोहाचे बहुजन समाज पक्ष (BSP) खासदार दानिश अली म्हणाले की, अहमद आणि त्याच्या भावाची थंड डोक्याने हत्या करण्यात आली आहे. हे उत्तर प्रदेशातील अराजकता शिगेला पोहोचल्याचे उदाहरण आहे. दुसरा कोणता लोकशाही असलेला देश असता तर कायद्याच्या विरोधात असे कृत्य केल्याने राज्य सरकार बरखास्त करण्यात आले असते.

राजदसह काँग्रेसकडून टीका-राष्ट्रीय लोक दल (RLD) प्रमुख जयंत चौधरी यांनी या घटनेचा व्हिडिओ रिट्विट करत प्रश्न उपस्थित केले आहेत. लोकशाहीत हे घडणे शक्य आहे का? काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार कपिल सिब्बल म्हणाले, यूपीमध्ये दोन हत्या झाल्या आहेत. पहिली हत्या अतिक अहमद आणि भाऊ अश्रफ यांची हत्या आणि दुसरी म्हणजे कायद्याचे राज्य असलेल्या राज्याची हत्या.

भाजपच्या काही नेत्यांकडून आनंद व्यक्त-माध्यमांशी बोलताना एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपवर कडाडून टीका केली आहे. एन्काउंटर राज' साजरा करणारे अहमदच्या हत्येला 'जबाबदार आहेत. दुसरीकडे भाजपच्या काही नेत्यांनी अतिक व त्याच्या भावाच्या हत्येबाबत सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला. उत्तर प्रदेशचे मंत्री स्वतंत्र देव सिंह म्हणाले की, पाप आणि पुण्याचा हिशोळ या जन्मातच घेतला जातो.

खोट्या एन्काउन्टरची व्यक्त केली होती भीती-रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणले असताना अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यांची शनिवारी रात्री पॉइंट ब्लँक रेंजमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. प्रयागराजला जात असताना अतिकने यापूर्वी माध्यमांशी बोलताना खोट्या एन्काउन्टरमध्ये मारली जाण्याची भीती व्यक्त केली होती. उमेश पाल अपहरण प्रकरणात प्रयागराज कोर्टाने अतिकला नुकतेच दोषी ठरवले होते. त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. पोलीस चकमकीत त्याच्या मुलाचा मृत्यू झाला. त्याच्यावर अंतिमसंस्कार झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अतिकची हत्या झाली आहे.

हेही वाचा-Atiq And Ashraf Ahmed Shot Dead : अतिक-अशरफची ऑन कॅमेरा गोळ्या झाडून हत्या, पत्रकार भासवून आले होते हल्लेखोर

Last Updated : Apr 16, 2023, 1:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details