महाराष्ट्र

maharashtra

One Killed In Lightning: बिहारमधील बेतिया जिल्ह्यात वीज पडून एकाचा मृत्यू

By

Published : Jun 22, 2022, 8:37 PM IST

बेतिया येथे 11 हजार व्होल्टचा वीज पडून एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ( One Killed In Lightning ) अपघाताच्या वेळी ही व्यक्ती दारात बसली होती, त्यादरम्यान हाय-टेन्शन वायर त्याच्या अंगावर पडली.

बिहारमधील बेतिया जिल्ह्यात वीज पडून एकाचा मृत्यू
बिहारमधील बेतिया जिल्ह्यात वीज पडून एकाचा मृत्यू

बेतिया (बिहार) - बिहारमधील बेतिया जिल्ह्यात 11 हजार व्होल्टची वायर तुटून पडल्याने एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. बुधवारी सकाळी 11 हजार व्होल्टची हाय टेंशन वायर त्याच्या अंगावर पडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यावेळी ती व्यक्ती त्यांच्या दारात बसली होती. हाय टेंशन वायर पडल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ( One Killed In Lightning ) ज्याचा व्हिडिओ समोर आला आहे. घटना बेतिया जिल्ह्यातील सिरिसिया पोलीस स्टेशन परिसरातील मुशारी सेनवारिया पंचायतीच्या प्रभाग क्रमांक 10 मधील कुर्मी टोला गावातील आहे. भुती प्रसाद (वय 65 वर्ष) असे मृताचे नाव आहे.

व्हिडीओ

मुसहरी सेनवारिया पंचायतीच्या कुर्मी टोला गावात वीज पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मृताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बेतिया जीएमसीएचमध्ये पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी एफआयआर नोंदवून पुढील कारवाई करण्यात येत आहे.

भुतीप्रसाद यांचा मृतदेह धुराच्या लोटात जळत असताना, हाय टेंशन वायरमध्ये करंट असल्याने कोणीही त्यात अडकण्याचे धाडस करत नव्हते. दरम्यान, या अपघाताची माहिती ग्रामस्थांनी विद्युत विभाग आणि स्थानिक सिरिसिया ओपी यांना दिली. माहिती मिळताच विद्युत विभागाचे कर्मचारी आणि सिरिसिया ओपीचे प्रभारी विकास कुमार तिवारी घटनास्थळी पोहोचले. वीज बंद केल्यानंतर तार काढून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

हेही वाचा -कोरोना, हिंदूत्व, राजीनामा, चर्चा आणि आवाहन; पाहा, मुख्यमंत्र्यांचा संपूर्ण व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details