महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Misbehaving With SpiceJet Air Hostess: दिल्ली-हैदराबाद स्पाईसजेट विमानात एअर होस्टेससोबत गैरवर्तन, एकाला अटक

दिल्ली-हैदराबाद स्पाईसजेटच्या विमानात एअर होस्टेससोबत गैरवर्तन करणाऱ्या एका व्यक्तीला सोमवारी अटक करण्यात आली. दिल्लीच्या IGI विमानतळावर एकत्र प्रवास करणाऱ्या दोन प्रवाशांना उतरवण्यात आले आणि एअर होस्टेससोबत गैरवर्तन केल्याचा आरोप केल्यानंतर त्यापैकी एकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

One held for misbehaving with cabin crew on Delhi-Hyderabad SpiceJet flight
दिल्ली-हैदराबाद स्पाईसजेट विमानात एअर होस्टेससोबत गैरवर्तन, एकाला अटक

By

Published : Jan 24, 2023, 5:02 PM IST

नवी दिल्ली:दिल्लीहून हैदराबादला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानात एअर होस्टेससोबत गैरवर्तन करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, स्पाईसजेटच्या सुरक्षा अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर, दिल्ली-हैदराबाद स्पाईसजेट फ्लाइटचा आरोपी प्रवासी अबसार आलम याला अटक करण्यात आली आहे. अबसार आलम याने फ्लाइटमध्ये बसलेल्या महिला क्रू सदस्यासोबत गैरवर्तन केले.

यापूर्वीही घडल्या आहेत गैरवर्तनाच्या घटना:गेल्या काही महिन्यांत विमानांमध्ये प्रवाशांशी गैरवर्तनाच्या अनेक घटना घडल्या आहेत. एअर इंडियामध्ये लघवीच्या घटनेशिवाय, 6 डिसेंबर 2022 रोजी पॅरिसहून नवी दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमान AI-142 मधील प्रवाशांशी गैरवर्तनाच्या दोन घटना DGCA च्या निदर्शनास आल्या आहेत. त्यामुळे विमानप्रवासामध्ये आता मोठ्या प्रमाणावर काळजी घेण्यात येत आहे.

या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक जण केबिन क्रू सदस्यावर ओरडताना दिसत आहे. दुसरा प्रवासी आरोपीची बाजू घेत असल्याचे दिसते. काही प्रवासी मध्यस्थी करून वाद थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. दिल्ली-हैदराबाद फ्लाइटमधील एका प्रवाशाने हा व्हिडिओ कथितरित्या शूट केला होता. स्पाईसजेटच्या सुरक्षा अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर दिल्ली-हैदराबाद स्पाईसजेट फ्लाइटमधील आरोपी प्रवाशी अबसार आलम याला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

सुरक्षा पथकाच्या ताब्यात दिले:ज्याने फ्लाइटमध्ये महिला क्रू मेंबरसोबत गैरवर्तन केले. तसेच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, स्पाईसजेटने एका निवेदनात म्हटले आहे की, दिल्लीत बोर्डिंग दरम्यान, एका प्रवाशाने केबिन क्रूला त्रासदायक आणि अयोग्य रीतीने वागणूक दिली. क्रूने पीआयसी (पायलट इन कमांड) आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली. प्रवासी आणि सहप्रवासी, जे एकत्र प्रवास करत होते, त्यांना उतरवून सुरक्षा पथकाच्या ताब्यात देण्यात आले.

कालही झाला असाच प्रकार:दिल्लीहून हैदराबादला उड्डाण करणाऱ्या स्पाईसजेटच्या वेट-लीज कॉरंडन विमान क्रमांक SG-8133 मध्ये सोमवारी एका प्रवाशाने गोंधळ घातला. दिल्ली येथे बोर्डिंग दरम्यान, प्रवाशाने बेजबाबदार आणि अनियंत्रित वर्तन केले आणि केबिन क्रूला त्रास दिला. या घटनेनंतर, प्रवासी आणि सहप्रवासी यांना फ्लाइटमधून उतरवण्यात आले आणि विमानतळावरील सुरक्षा पथकाच्या ताब्यात देण्यात आले.

हेही वाचा: Spicejet विमानाने उड्डाण करताच छतावरून पाणी लागले टपकायला एअर होस्टेसने दिला टिश्यू पेपर पहा व्हिडीओ

ABOUT THE AUTHOR

...view details