महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Odisha Train Accident: एनडीआरएफने अपघातग्रस्त रेल्वेच्या डब्ब्यातून प्रवाशांचा शोध घेण्याकरिता वापरले उच्च तंत्रज्ञान - मानवी जीवनाचा शोध घेण्यासाठी K9 कॅनाइन्स वापर

एनडीआरएफमधील डीआयजी (ऑप्स) मोहसेन शाहेदी यांनी सांगितले की, शुक्रवारी झालेल्या ओडिशा रेल्वे अपघातातील मानवी जीव शोधण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) उच्च-तंत्रज्ञान साधने आणि K9 सेवा वापरत आहे.

NDRF using hi-tech tools
रेल्वे अपघातात NDRF चे बचाव कार्य

By

Published : Jun 4, 2023, 9:03 AM IST

नवी दिल्ली :ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात तिहेरी रेल्वेचा अपघात झाला. यात जवळपास 300 लोकांचा मृत्यू झाला असून 900 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. हा रेल्वेच्या अपघात इतिहासातील सर्वात मोठा अपघात असल्याचे सांगितले जात आहे. बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस, शालीमार-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीमध्ये अपघात झाला आहे. दरम्यान अपघातग्रस्त रेल्वे डब्ब्यांमध्ये अजूनही प्रवाशी अडकले आहेत. अपघातात दबलेल्या रेल्वे डब्ब्यातून प्रवाशांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ)चे जवान बाहेर काढत आहेत. प्रवाशांना शोधण्यासाठी एनडीआरएफ प्रगत तंत्रज्ञान वापरत आहे. डब्ब्यांमधून अडकून पडलेल्या व्यक्तींना शोधण्यासाठी या दलाकडून K9 सेवेचा उपयोग केला गेला.

वाढती मृतांची संख्या : बालासोरमधील बहनगा स्थानाकाजवळ तीन रेल्वेचा भीषण अपघात झाला. या रेल्वे अपघातातील मृतांचा आलेख वाढता दिसत आहे. मृतांचा आकडा साधरण 300 पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 288 जणांचा मृत्यू झाला आहे. एनडीआरएफ, रेल्वे यांच्या पथकाकडून अनेक लोकांना सुखरुप बाहेर देखील काढण्यात आले. परंतु मृतांचा आकडा जास्त असल्याने त्यांची ओळख पटवून देण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

बचावकार्यसाठी एनडीआरएफची 8 पथके होती कार्यरत :एनडीआरएफचे डीआयजी (Ops) मोहसेन शाहिदी म्हणाले की, "शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. तीन रेल्वेची टक्कर झाली. हा अपघात एक भीषण अपघात होता. अपघात झाल्यानंतर घटनेच्या स्थळापासून 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या बालासोर येथील प्रादेशिक प्रतिसाद केंद्रातून एक पथक त्वरीत घटनास्थळी दाखल झाले होते. दाखल होताच पथकाने बचाव कार्य सुरू केले. तसेच ओडिशातील मुंडलीमधील युनिट मुख्यालयातून अजून 6 पथके घटनास्थळी बोलवले. या पथकांसोबत कमांडंट होते. जेव्हा हे समजले की, बरीच जीवितहानी होऊ शकते, तेव्हा आम्ही पश्चिम बंगालमध्ये एनडीआरएफची दुसरी बटालियन असलेल्या कोलकाता येथून दोन पथके बोलवली. जेणेकरुन न थांबता बचाव कार्य सुरू राहील.

प्रवाशांना शोधण्यासाठी NDRF कडून K9 सेवेचा वापर : हा इतका भीषण अपघात होता की, यात रेल्वेचे डब्बे पूर्णपणे दाबल्या गेले. यात प्रवाशी अडकले होते. यात काही जिवंत प्रवाशांना वाचवण्यासाठी एनडीआरएफने के 9 म्हणजे K9 या तंत्रज्ञानाचा उपयोग केला. एनडीआरएफचे डीआयजी म्हणाले होते की, बचाव कार्य अंतिम टप्प्यात आल्यानंतर कोणी प्रवाशी सुटू नये यासाठी आम्ही याची खात्री करत होतो. एनडीआरएफच्या जवानांना ट्रेन अपघातासारख्या ऑपरेशन्स करण्यासाठी प्रशिक्षित केले जाते. त्यांच्याकडे विशेष उपकरणे देखील आहेत ज्यासाठी बचावकर्ते प्रशिक्षित आहेत. रेस्क्यू ऑपरेशन्स दरम्यान ऍक्सेस टूल्स आणि प्लाझ्मा टेक सारख्या विविध तंत्रज्ञानाचा वापर केला गेला. या ऑपरेशन्समध्ये प्लाझ्मा कटर, बोल्ट कटर आणि इतर गोष्टींचा वापर केला गेला.

रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी : या भीषण रेल्वे अपघातावरुन विरोधी पक्षांकडून केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. दरम्यान विरोधकांना रेल्वेमंत्र्यांनी फटकारले आहे. रेल्वेमध्ये कवच या सुरक्षा प्रणालीचा वापर करण्यात आला नव्हता. तसेच या रेल्वेमध्ये अपघात थांबवणारी प्रणालीच नव्हती असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

हेही वाचा -

  1. Odisha Train Accident : ओडिशा रेल्वे अपघाताबद्दल अमेरिकेकडून शोक व्यक्त... १०० मृतदेह एम्स भुवनेश्वरमध्ये ठेवण्यात येणार
  2. Sharad Pawar Reaction: ओडिशा रेल्वे अपघाताबाबत शरद पवारांचे मोठे विधान, इतिहासातील 'त्या' घटनेची करून दिली आठवण

ABOUT THE AUTHOR

...view details