पुरी - जगन्नाथ मंदिरासमोरील ऐतिहासिक एमार मठाजवळ मंगळवारी रात्री एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हरचंडी तालुचा शाही या तीर्थक्षेत्रातील मंदिराच्या पुजाऱ्याचा मुलगा शिवराम पात्रा असे मृताचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुरी जगन्नाथ मंदिराच्या सिंह द्वारपासून (मुख्य दरवाजा) अवघ्या 20 मीटर अंतरावर दुचाकीवरून ( firing near Jagannath temple ) आलेल्या दोन हल्लेखोरांनी दोन गोळ्या झाडल्या. या गोळीबारात पुजाऱ्याचा मुलगा शिवरामचा जागीच ( priest son death in Puri ) मृत्यू झाला.
गुन्ह्यात वापरलेले शस्त्रही जप्त-घटनास्थळी पोहोचलेले पुरीचे पोलीस अधीक्षक (एसपी) कंवर विशाल सिंह यांनी सांगितले की, 'सिंह द्वार' पोलिसांनी ताबडतोब रुग्णवाहिका बोलावली. जखमी व्यक्तीला पुरीच्या जिल्हा मुख्यालय रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. मुख्य आरोपीचे नाव चंदन बारीक असे आहे. गुन्ह्यात वापरलेले शस्त्रही जप्त करण्यात आले आहे. एसपी म्हणाले की, 'मुख्य आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. हा खून वैयक्तिक वैमनस्यातून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पुढील तपास सुरू आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमप्रकरणातून मृताची हत्या करण्यात आली आहे.