महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

ओडिशात वयोवृद्ध व्यक्तीने पत्नीच्या चितेवर उडी घेत जीवनयात्रा संपवली - निलामणी साबर चितेवर उडी

एका वयोवृद्ध व्यक्तीने पत्नीच्या चितेवर उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना गोलामुंडा ब्लॉकमधील सियालजोडी या गावात मंगळवारी घडली होती. निलामणी साबर (वय 65) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

By

Published : Aug 25, 2021, 10:33 PM IST

भवानीपटणा (ओडीशा) - एका वयोवृद्ध व्यक्तीने पत्नीच्या चितेवर उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली, अशी माहिती पोलिसांनी बुधवारी दिली. ही घटना गोलामुंडा ब्लॉकमधील सियालजोडी या गावात मंगळवारी घडली होती. निलामणी साबर (वय 65) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

हेही वाचा -खासदार-आमदारांच्या प्रकरणात सीबीआयसह ईडीकडून दिरंगाई; सर्वोच्च न्यायालयाची नाराजी

साबर यांनी आपली चार मुले आणि नातेवाईक परंपरेनुसार जवळच्या जलाशयात आंघोळ करायला गेल्या नंतर पत्नी रायबारी (वय 60) यांच्या चितेवर अचानक उडी घेतली, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.

हेही वाचा -अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर सीडीएस बिपिन रावत यांनी 'ही' दिली प्रतिक्रिया

ABOUT THE AUTHOR

...view details