महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Naveen Patnaik : नवीन पटनायक यांचा नवा रेकॉर्ड, बनले सर्वाधिक काळ पदावर राहणारे दुसरे मुख्यमंत्री - ज्योती बसू

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ज्योती बसू यांचा विक्रम मोडत सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवणारे दुसरे मुख्यमंत्री ठरले आहेत.

Naveen Patnaik
नवीन पटनायक

By

Published : Jul 22, 2023, 10:17 PM IST

भुवनेश्वर : ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे. ते देशात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहणाऱ्या नेत्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहचले आहेत. शनिवार त्यांनी पश्चिम बंगालचे दिवंगत माजी मुख्यमंत्री ज्योती बसू यांना मागे टाकले.

वाजपेयी सरकारमध्येही मंत्री होते : नवीन यांनी 1997 मध्ये त्यांचे वडील बिजू पटनायक यांच्या निधनानंतर राजकारणात प्रवेश केला होता. बिजू जनता दल (बीजेडी) ची स्थापन करून ते बिजू बाबूंचे उत्तराधिकारी म्हणून राजकारणात आले. नवीन पटनायक अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्येही मंत्री होते. ते त्यांच्या आस्का या कौटुंबिक सीटवरून लोकसभा निवडणूक लढून केंद्रीय मंत्री बनले होते.

सलग पाचवेळा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली : 2000 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपसोबत युती करून ओडिशामध्ये सरकार स्थापन केले. त्यानंतर 5 मार्च 2000 पासून आजपर्यंत त्यांनी सलग पाचवेळा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. नवीन पटनायक 2000, 2004, 2009, 2014 आणि 2019 मध्ये सतत मुख्यमंत्री झाले. दरम्यान, त्यांनी अनेक विक्रम केले आणि मोडले. त्यांना विविध संस्थांकडून देशातील प्रथम क्रमांकाचे मुख्यमंत्री तसेच लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून पुरस्कार मिळाले आहेत.

सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा मान या नेत्याला : देशात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा मान सिक्कीमचे मुख्यमंत्री पवनसिंग चामलिंग यांना आहे. सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटचे नेते चामलिंग हे 12 डिसेंबर 1994 ते 27 मार्च 2019 पर्यंत सतत सिक्कीमचे मुख्यमंत्री होते. त्यांनी 24 वर्षे 16 दिवस मुख्यमंत्री म्हणून काम केले. तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या ज्योती बसू ह्या 23 वर्षे 138 दिवस पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री होत्या. नवीन पटनायक यांनी 22 जुलै 2023 रोजी ज्योती बसू यांचा हा रेकॉर्ड मोडला.

..तर नवीन पटनायक हाही विक्रम मोडतील : आता नवीन पटनायक यांच्या नेतृत्वाखालील बीजेडी सरकारने 2024 च्या निवडणुका जिंकून राज्यात पुन्हा सरकार स्थापन केले तर त्यांना सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा मान मिळेल. ऑगस्ट 2024 मध्ये नवीन पटनायक हा विक्रम आपल्या नावावर करतील. उल्लेखनिय बाब म्हणजे नवीन पटनाईक हे एका मुख्यमंत्र्याचे पुत्र. त्यांचे बहुतांश शिक्षण हे परदेशात झाले आहे. त्यांचा स्थानिक लोकांशी नंतरच्या काळात प्रत्यक्ष संपर्क आला. त्यानंतर त्यांनी लोकांची नस ओळखून झपाट्याने काम करण्यास सुरुवात केली आणि आज त्यांनी नविन विक्रम केला आहे.

हेही वाचा :

  1. Oommen Chandy : या व्यक्तीने एकेकाळी केला होता मुख्यमंत्री ओमन चंडींवर हल्ला, आता मानतो 'देवमाणूस'!, जाणून घ्या काय आहे कारण..

ABOUT THE AUTHOR

...view details