महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Budget Smartphone : मोठ्या स्क्रीनसह ब्रँडेड मोबाइल लॉन्च, दीर्घ बॅटरी लाइफ, अतिशय कमी किमतीत - ऑक्टा कोर प्रोसेसर

कमी बजेट असणाऱ्या लोकांसाठी नोकियाने स्वस्त Android फोन Nokia C12 लॉन्च केला आहे. 17 मार्चपासून मोबाईल फोनची विक्री ऑनलाईन आणि ऑफलाईन अश्या दोन्ही पध्दतीने सुरू होणार आहे.

Budget Smartphone
नोकिया स्मार्टफोन सी 12

By

Published : Mar 14, 2023, 2:23 PM IST

सॅन फ्रान्सिस्को :नोकिया फोनचे माहेरघर असलेल्या HMD ग्लोबलने सोमवारी भारतात आपला नवीन बजेट स्मार्टफोन 'C12' लॉन्च करण्याची घोषणा केली. 5,999 रुपयांची किंमत असलेला हा फोन डार्क सियान, चारकोल आणि लाइट मिंट या रंगांमध्ये उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन 17 मार्चपासून ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध असेल. भारत आणि मेना, एचएमडी ग्लोबलचे उपाध्यक्ष सनमीत सिंग कोचर यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, 'नोकिया C12 यापूढे नोकिया स्मार्टफोन्सना जाहिरातमुक्त Android चा अनुभव, दीर्घ बॅटरी आयुष्य, युरोपियन डिझाइन, दुप्पट सुरक्षितता आणि अर्थातच मनाच्या अतिरिक्त मनःशांतीसाठी एक वर्षाच्या रिप्लेसमेंटची गॅरंटी देत आहे. ॲडव्हान्स वापरकर्त्यांच्या अनुभवासाठी ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि वर्चुअल मेमोरी एक्सटेंशन विस्तारासह हा फोन उपलब्ध आहे.


मोठ्या स्क्रीनसह ब्रँडेड मोबाइल लॉन्च

जलद कार्य करणारे ॲप :कंपनीने म्हटले आहे की, या स्मार्टफोनसह वापरकर्त्यांना Android 12 मुळे 30 टक्के अधिक जलद कार्य करणारे ॲप मिळेल. नवीन बजेट स्मार्टफोन नाईट आणि पोर्ट्रेट मोडसह, ॲडव्हान्स इमेजिंगसह, पुढील आणि मागील दोन्ही कॅमेर्‍यांसाठी चांगली कामगिरी करतो.

फिचर वैशिष्ट्य : याशिवाय, नवीन C12 ऑक्टा कोर प्रोसेसर, 2GB व्हर्च्युअल रॅम, सुव्यवस्थित OS आणि पुढील आणि मागील दोन्ही कॅमेर्‍यांसाठी नाईट आणि पोर्ट्रेट मोडसह सुधारित इमेजिंगसह सुधारित कार्यप्रणाली आणि उत्कृष्ट प्रदर्शन यामध्ये उपलब्ध आहे. फोनमध्ये 6.3-इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले आहे. ज्यामध्ये 8 एमपी फ्रंट आणि 5 एमपी रियर कॅमेरे आहेत. शिवाय, कंपनीने म्हटले आहे की, या स्मार्टफोनसह, वापरकर्त्यांना Android 12 (Go Edition) मुळे 30 टक्के अधिक जलद कार्य करणारे ॲप मिळेल.

सायबर सुरक्षा : वाढत्या सायबर धोक्यांच्या जगात, कंपनीने नमूद केले आहे की C-Series कुटुंब वापरकर्त्यांना सतत वाढणाऱ्या धोक्यांपासून वाचवण्यासाठी किमान दोन वर्षे नियमित सुरक्षा अपडेट सुनिश्चित करते. तुम्ही जर का मोबाईल फोनच्या इतर स्पेसिफिकेशन्सवर नजर टाकली, तर तुम्हाला ऑक्टाकोर (Unisoc 9863A1) प्रोसेसर मिळेल. या स्मार्ट फोन मध्ये 2GB रॅम तसेच 64GB इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. परंतु, आपली इच्छा असल्यास, आपण 4GB पर्यंत रॅम वाढवू शकता.

हेही वाचा : Samsung Galaxy Z Fold 5 : सॅमसंग गॅलक्सी या फोनमध्ये देणार जबरदस्त फिचर, जाणून घ्या काय आहे वैशिष्टये

ABOUT THE AUTHOR

...view details