नवी दिल्ली - बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार Bihar Chief Minister Nitish Kumar यांनी आज राजधानी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट Nitish meets Rahul Gandhi in Delhi घेतली. आजच ते आप पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल Delhi Chief Minister Arvind Kejriwal यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये भाजपासोबतची आघाडी तोडल्यापासून नितीश कुमार राष्ट्रीय पातळीवर विरोधकांची आघाडी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे राजकीय चित्र सध्या दिसत आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, जेडी(एस) नेते एचडी कुमारस्वामी आणि इतरांनाही ते भेटणार आहेत. कुमार सपा प्रमुख अखिलेश यादव यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे. दिल्लीला जाण्यापूर्वी नितीश कुमार यांनी पाटणा येथे प्रसारमाध्यमांना राहुल गांधी आणि इतर नेत्यांना भेटणार असल्याचे सांगितले होते. नितीश कुमार म्हणाले, "आम्ही फक्त अनौपचारिक चर्चा करत आहोत, मी दिल्लीहून परत आल्यानंतर तुमच्याशी (मीडिया) संवाद साधेन. मी आज दिल्लीत राहुल गांधींना भेटेन आणि आदरणीय राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींचीही भेट घेणार आहे.