बिहारचे मुख्यमंत्री म्हणून जदयुचे नेते नितीश कुमार ( CM Nitish Kumar ) यांनी आज शपथ घेतली. कालपर्यंत भाजपसोबत मुख्यमंत्रीपदावर असलेले नितीश कुमार यांनी मंगळवारी सायंकाळी राज्यपालांची भेट घेऊन राजीनामा दिला होता. आता जदयु, राजद, काँग्रेस अशा नऊ पक्षांची महाआघाडी करून त्यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राजदचे नेते तेजस्वी यादव ( RJD leader Tejashwi Yadav ) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नितीश कुमार आठव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री झाले आहेत.
Nitish Kumar Took Oath As Chief Minister : नितीश कुमार यांनी घेतली आठव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ, तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री
बिहारचे मुख्यमंत्री म्हणून जदयुचे नेते नितीश कुमार ( CM Nitish Kumar ) यांनी आज शपथ घेतली. कालपर्यंत भाजपसोबत मुख्यमंत्रीपदावर असलेले नितीश कुमार यांनी मंगळवारी सायंकाळी राज्यपालांची भेट घेऊन राजीनामा दिला होता. आता जदयु, राजद, काँग्रेस अशा नऊ पक्षांची महाआघाडी करून त्यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
Nitish Kumar Took Oath As Chief Minister
बिहारच्या राजकारणात गेल्या दोन दिवसात नाट्यमय घडामोडी घडल्या. नितीश कुमार यांनी भाजपशी काडीमोड घेत मंगळवारी राजीनामा दिला होता. त्यानंतर लगेचच त्यांनी महाआघाडी सरकारच्या स्थापनेचा दावा केला होता. आज दुपारी दोन वाजता नितीश कुमार यांनी महाआघाडी सरकारचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा शपथ घेतली. बिहारच्या राज्यपालांनी त्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली.
हेही वाचा -Sharad Pawar Attack On BJP: 'भाजप मित्र पक्षाला हळूहळू संपवतात'; पवारांचा भाजपवर हल्लाबोल