Dinner Diplomacy : दिल्लीत शरद पवारांच्या घरी महाराष्ट्रातील आमदारांना स्नेहभोजन, नितीन गडकरींसह भाजपच्या आमदारांनाही निमंत्रण - Pawar residence for dinner
शरद पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी आयोजित स्नेहभोजनासाठी नितीन गडकरी, संजय राऊत उपस्थित होते. राऊत यांच्या मुंबईस्थित घरावर आज ईडीने जप्तीची कारवाई केली आहे.
नवी दिल्ली- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ( NCP leader Sharad Pawar's residence ) महाराष्ट्रातील आमदारांसाठी ( Maharashtra MLA ) स्नेहभोजन आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाला महाविकास आघाडीच्या आमदारांसोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ( Union Minister Nitin Gadkari ) आणि भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनाही निमंत्रण देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे प्रवक्ते आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत ( Shiv Sena leader Sanjay Raut ), सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या.