महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

NITI Aayog with KidEx : निती आयोग करणार किड्सएक्स सोबत नवीन उपक्रम - अटल इनोवेशन मिशन

अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत, NITI आयोगाने गुरुवारी KidEx व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड सोबत भागीदारीची घोषणा केली आहे, ज्यामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये नावीन्य आणि उद्योजकतेला प्रोत्साहन मिळेल.

NITI AYOG
NITI AYOG

By

Published : Mar 11, 2022, 12:21 PM IST

नवी दिल्ली : शालेय विद्यार्थ्यांमध्ये नवकल्पना आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी अटल इनोव्हेशन मिशन ( Atal Innovation Mission ) NITI आयोगाने गुरुवारी KidEx च्या तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म "IKIGAI" KidEx Venture Private Limited सोबत भागीदारीची घोषणा केली आहे. या अंतर्गत दोन वर्षांच्या कालावधीत, अटल इनोव्हेशन मिशन आणि KidEx किमान 10 लाख तरुण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार असल्याचेही सांगितले. यामध्ये AIM प्रोप्रायटरी प्रोग्राम्समध्ये एक्सपोजर मिळेल असे NITI आयोगाने एका निवेदनात म्हटले आहे.

"AIM मध्ये, आम्ही आमच्या अत्याधुनिक अटल टिंकरिंग लॅबच्या नेटवर्कचा फायदा घेता येईल. यामुळे नाविन्य आणि उद्योजकतेची संस्कृती वाढेल. KidEx सोबतची ही भागीदारी शिक्षकांना आणि मार्गदर्शकांना अनुभव देईल. यासारखे स्मार्ट आणि अंतर्ज्ञानी तंत्रज्ञान ATL साठी नाविन्यपूर्ण अनुभव वाढवतील," असे मिशन डायरेक्टर अटल इनोव्हेशन मिशन, NITI आयोगचे चिंतन वैष्णव म्हणाले. या प्रकल्पाचा पहिला भाग 1 मे 2022 रोजी 9600+ शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी AIM बूटकॅम्प द्वारे होईल. हा कार्यक्रम 9 आठवड्यांचा आभासी बूटकॅम्प आहे. इयत्ता 1वी मधील ATL नेटवर्क शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य उपलब्ध आहे. असे NITI आयोगाने सांगितले.

हेह वाचा -Goa Assembly Election 2022 : भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदासाठी आज होणार बैठक

ABOUT THE AUTHOR

...view details