महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

NIA ची मोठी कारवाई.. ISIS चा ऑनलाईन प्रचार करणाऱ्याला दिल्लीतील बाटला हाऊस परिसरातून अटक - ETV Bharat delhi news

राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) पथकाने काल रात्री जामिया नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाटला हाऊस परिसरातून एका संशयिताला पकडले आहे. आरोपीवर इसिसचा ऑनलाइन प्रचार चालवल्याचा आरोप आहे. ( NIA Arrest ISIS Suspect ) ( Jamia nagar batla house )

NIA TEAM ARRESTED A SUSPECT FROM BATLA HOUSE AREA
NIA ची मोठी कारवाई.. ISIS चा ऑनलाईन प्रचार करणाऱ्याला दिल्लीतील बाटला हाऊस परिसरातून अटक

By

Published : Aug 7, 2022, 4:41 PM IST

नवी दिल्ली :स्वातंत्र्य दिनापूर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) पथकाने काल रात्री दिल्लीतील जामिया नगर पोलीस स्टेशन हद्दीतील बाटला हाऊस परिसरातून एका संशयिताला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एनआयए टीमने या संशयिताला ISIS चा ऑनलाइन प्रचार चालवल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. मोहसीन असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. ( NIA Arrest ISIS Suspect ) ( Jamia nagar batla house )

मिळालेल्या माहितीनुसार, एनआयए टीमला संशयित आरोपींबाबत माहिती मिळाली होती की तो सोशल मीडियावर आयएसआयएसचा प्रचार करत होता, त्यानंतर एनआयएच्या टीमने शनिवारी संध्याकाळी जामिया नगरच्या बाटला हाऊस परिसरात छापा टाकला आणि संशयित मोहसीनला अटक केली. आरोपी बाटला हाऊस परिसरातील जोगाबाई एक्स्टेंशन येथे राहत होता. NIA ने 25 जून रोजी आयपीसीच्या कलम 153A, आणि 153B आणि UA (P) कायद्याच्या कलम 18, 18B, 38, 39 आणि 40 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

सूत्राने सांगितले की, अटक करण्यात आलेला आरोपी हा प्रतिबंधित दहशतवादी संघटना ISIS चा कट्टर आणि सक्रिय सदस्य आहे. येत्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. स्वातंत्र्य दिनापूर्वी या संशयित आरोपीला अटक करणे हे सुरक्षा यंत्रणांचे मोठे यश मानले जात आहे.

हेही वाचा :'डी गॅंग' पुन्हा सक्रिय? दिल्ली आणि मुंबईत दहशतवादी हल्ल्याची शक्यता

ABOUT THE AUTHOR

...view details