महाराष्ट्र

maharashtra

NIA Arrest Female Naxal: एनआयने आवळल्या कुख्यात महिला नक्षलवाद्यांच्या मुसक्या

By

Published : Jan 30, 2023, 5:38 PM IST

बिजापूरमध्ये 2021 मध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यामध्ये चकमक झाली होती. या चकमकीत 22 जवान शहीद झाले होते. या हल्ल्याप्रकरणी कुख्यात महिला नक्षलवादी मदकम उनगी उर्फ कमला ही वाँटेड होती. तिच्या मुसक्या आवळण्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेला यश आले आहे.

NIA Arrest Wanted Female Naxal
संपादित छायाचित्र

रायपूर : राष्ट्रीय तपास संस्थेने कुख्यात नक्षलवादी महिलेला 29 जानेवारीला अटक केली आहे. मदकम उनगी उर्फ कमला असे या नक्षवादी महिलेचे नाव आहे. या महिलेला बीजापूरमध्ये 2021 मधील मे आणि जून महिन्यात झालेल्या चकमकीप्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने ही अटक केली आहे. बिजापूरमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 22 जवान शहीद झाले होते. या कुख्यात नक्षलवादी महिलेला जगदलपूरच्या विशेष एनआयए न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती सुरक्षा दलाच्या वतीने देण्यात आली आहे.

आवळल्या मुसक्या :राष्ट्रीय तपास यंत्रणेचे जवान तपास करत असताना खबऱ्याने मदकम उनगी उर्फ कमला ही बिजापूरच्या भोपालपट्टनम परिसरात लपलेली असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे राष्ट्रीय तपास यंत्रणेने रायपूरच्या एका पथकाला याबाबत शोध मोहीमेवर पाठवले होते. यावेळी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकाने भोपालपट्टनम येथील परिसरात सापळा लाऊन मुथमद्गू उदतमल्ला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पैमेड येथून कमलाच्या मुसक्या आवळल्या. कुख्यात नक्षलवादी महिलेच्या मुसक्या आवळल्याने हे राष्ट्रीय तपास यंत्रणेचे मोठे यश मानले जाते.

चकमकीत 22 जवान शहीद :पोलीस आणि नक्षलवाद्यांच्या दरम्यान सुकमा जिल्ह्यातील तार्रेम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तेकलगुडीया गावालगत चकमक झाली होती. ही चकमक 4 एप्रील 2021 ला झाली होती. यावेळी पिपल्स लिबरेशन गोरिल्ला आर्मीचे नक्षलवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये जोरदार चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलाच्या 22 जवानांना वीरमरण आले होते. नक्षलवाद्यांनी सापळा लावत जवानांवर हल्ला केला होता. याप्रकरणी सुरक्षा दलांनी तर्रेम पोलीस ठाण्यात जून 2021 मध्ये नक्षलवाद्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर 5 जून 2021 ला हे प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेने आपल्या हाती घेत तपासाला सुरुवात केली होती.

नक्षली कमांडरला शोधण्यासाठी :बिजापूरमध्ये पिपल्स लिबरेशन गोरिल्ला आर्मीचा नक्षलवादी कमांडर हिडमाच्या शोधात सुरक्षा दलाचे पथक निघाले होते. मात्र त्यादरम्यानच जोनागुडा या गावात दबा धरुन बसलेल्या नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलावर हल्ला केला. यावेळी उ़डालेल्या चकमकीत नक्षलवाद्यांनी गोळीबारासह सुरक्षा दलावर रॉकेट लाँचेरनेही हल्ला केला. त्यामुळे सुरक्षा दलाचे मोठे नुकसान झाले. मात्र तरीही सुरक्षा दलाने 15 नक्षलवाद्यांना यमसदनी धाडले.

40 लाखाचा इनामी हिडमाला :या वर्षाच्या सुरुवातीलाच सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. तेलंगाणा बिजापूर सीमेवर सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली होती. या चकमकीत कोबरा कमांडोनी मदवी हिडमा याला यमसदनी धाडले. सरकारने हिडमावर 40 लाख रुपयाचा इनाम जाहीर केला होता.

हेही वाचा - Bomb Blast at Peshawar : बॉम्ब हल्ल्याने पाकिस्तान हादरला, पेशावरमधील मशीदीवर हल्ल्यात किमान 28 नागरिकांचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details