आज जागतिक लोकसंख्या दिवस -
आज जागितक लोकसंख्या दिवस आहे. 11 जुलै 1987 रोजी जगात 5 अब्जावं अपत्य जन्माला आलं. तेव्हापासून हा दिवस जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून साजरा केला जातो.
विम्बल्डन 2021 : जोकोविचची नजर 20व्या ग्रँड स्लॅमवर, बेरेटिनी सोबत होणार आज अंतिम सामना
जगातील क्रमांक एकचा टेनिस खेळाडू सार्बियाचा स्टार नोवाक जोकोविच आज रविवारी विम्बल्डनच्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात मोटेयो बेरेटिनी विरोधात खेळणार आहे. त्याची नजरे 20व्या ग्रँड स्लॅमवर असणार आहेत. जोकोविचचा हा 30वा अंतिम सामना आहे.
वेस्ट इंडिज-ऑस्ट्रेलिया दरम्यान आज दुसरा टी-20 सामना
वेस्ट इंडिज-ऑस्ट्रेलिया दरम्यान आज दुसरा टी-20 सामना होणार आहे. सेंट लुसिया येथील डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिक्रेट स्टेडियमवर हा सामना आयोजित करण्यात आला आहे.
अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ रुरकीचे आज उद्घाटन होणार
अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ रुरकीचे (University of Engineering and Technology Roorkee) आज उद्घाटन होणार आहे. 75 एकरमध्ये विद्यापीठीचे कॅम्पस आहे. याठिकाणी पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडी साठी प्रवेश घेता येणार आहे. रुरकी शहरापासून हे विद्यापीठ 7 किमी अंतरावर आहे.
मान्सून आज व्यापणारसंपूर्ण राजस्थान
राजस्थानमधील अनेक भागात मान्सूनचे आगमन झाले आहे. शनिवारी राज्यातील अनेक जिल्ह्यात पाऊस झाला. तर आता येत्या 24 तासांत मान्सूनचे आणखी काही ठिकाणी आगमन होणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, जयपूरसह पूर्व राजस्थानच्या जिल्ह्यांमध्ये रविवार मान्सूनचे आगमन होणार आहे. या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, मागील 24 तासांत राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस झाला.
माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचा आज जन्मदिवस
माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचा जन्म 11 जुलै 1953मध्ये कानपूर येथे झाला होता. ते केंद्रातील मोदी सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळात उद्योगमंत्री आणि नागरी उड्डयानमंत्री होते. 2014मध्ये त्यांनी शिवसेना पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता.
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक अमिताव घोष यांचा जन्मदिवस
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक अमिताव घोष यांचा आज जन्म 11 जुलै 1956मध्ये कोलकाता येथे झाला आहे. दिल्ली आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातून त्यांचे शिक्षण झाले आहे. त्यांना 54व्या ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.