महाराष्ट्र

maharashtra

Newsclick : 'न्यूजक्लिक'चे संस्थापक प्रबीर पुरकायस्थ यांच्यासह दोघांना अटक, कार्यालयही सील

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 3, 2023, 10:10 PM IST

Newsclick : दिल्ली पोलिसांनी मंगळवारी न्यूजक्लिक वेबसाइटचे संपादक प्रबीर पुरकायस्थ, एचआर प्रमुख अमित चक्रवर्ती यांना अटक केली. दिल्ली पोलिसांनी दोघांवर यूएपीए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी दिल्ली पोलिसांनी न्यूजक्लिकशी संबंधित 30 ठिकाणी छापे टाकले. त्यानंतर काही जणांना ताब्यात घेण्यात आले होते.

Newsclick
Newsclick

नवी दिल्ली : Newsclick : दिल्ली पोलिसांनी मंगळवारी 'न्यूजक्लिक' या न्यूज पोर्टलचे संस्थापक तसंच मुख्य संपादक प्रबीर पुरकायस्थ तसेच फर्मचे शेअरहोल्डर अमित चक्रवर्ती यांना यूएपीए कायद्यांतर्गत (UAPA) दाखल केलेल्या गुन्ह्यात अटक केली. न्यूजक्लिक आणि त्यांच्या पत्रकारांशी संबंधित 30 परिसरांवर दिवसभर छापे टाकून चौकशी केल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली. त्यांना बुधवारी पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात येणार आहे. याच प्रकरणात स्पेशल सेलच्या कार्यालयात अनेकजणांची चौकशी सुरू राहणार आहे.

न्यूजक्लिकचं कार्यालयही सील : दक्षिण दिल्लीतील साकेत येथील न्यूजक्लिकचे कार्यालयही सील करण्यात आलं आहे. चीनच्या समर्थनार्थ प्रचारासाठी पैसे मिळाल्याच्या आरोपानंतर 'न्यूजक्लिक'वर ही कारवाई करण्यात आली आहे. दिल्ली-एनसीआर भागात विशेष सेलचं छापे मंगळवारी सकाळपासून सुरू होते. नंतर प्रबीर पुरकायस्थ यांना ‘न्यूजक्लिक’च्या दक्षिण दिल्लीतील कार्यालयात नेण्यात आलं. जेथे फॉरेन्सिक टीम आधीच उपस्थित होती.

ए, बी, सी श्रेणीत चौकशी : सूत्रांनी सांगितले की, ज्या व्यक्तींची चौकशी करण्यात आली आहे, त्यात पत्रकार उर्मिलेश, अनिंद्यो चक्रवर्ती, अभिसार शर्मा, परंजय गुहा ठाकुर्ता तसेच इतिहासकार सोहेल हाश्मी, सेंटर फॉर टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपमेंटचे डी. रघुनंदन यांचा समावेश आहे. सूत्रांनी सांगितलं की, पोलिसांनी विविध मुद्द्यांशी संबंधित 25 प्रश्न विचारले. ज्यात त्यांचे परदेश दौरे, शाहीन बागेतील नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध आंदोलन, शेतकऱ्यांचं आंदोलन इत्यादी प्रश्नांचा समावेश होता. सूत्रांनी सांगितलं की, ज्या लोकांची चौकशी करण्यात आली आहे, त्यांची ए, बी, सी अशा तीन श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली आहे.

तपास यंत्रणा स्वतंत्र : केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी भुवनेश्वरमध्ये सांगितलं की, देशातील तपास यंत्रणा स्वतंत्र आहेत. त्या कायद्यानुसार काम करतात.'कुणी काही चुकीचं केलं असेल, तर तपास यंत्रणा त्या संदर्भात काम करते. असं कुठेही लिहिलेलं नाही की तुम्ही बेकायदेशीरपणे पैसे घेतले असतील किंवा काही आक्षेपार्ह केले असेल तर तपास यंत्रणा चौकशी करू शकत नाही.

सहा तासांची चौकशी : सुमारे सहा तासांच्या चौकशीनंतर उर्मिलेश आणि चक्रवर्ती दुपारी 4.15 वाजता लोधी रोडवरील स्पेशल सेलच्या कार्यालयातून बाहेर आले. यावेळी त्यांनी तेथे जमलेल्या पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली नाहीत. यादरम्यान उर्मिलेश म्हणाले, मी काहीही बोलणार नाही. सुमारे तासाभरानंतर शर्मा तपास यंत्रणेच्या कार्यालयातून बाहेर आले. त्यांच्यानंतर रघुनंदन बाहेर आले, त्यांनी पत्रकारांना सांगितले की, त्यांना 'न्यूजक्लिक' बद्दल अतिशय सामान्य प्रश्न विचारण्यात आले होते.

हेही वाचा -

  1. Raids at Sitaram Yechury residence : सीताराम येचुरी यांच्या निवासस्थानावर छापा, न्यूजक्लिक लिंकला चीनच्या फंडिंगवरुन संशय
  2. Nobel Prize In Physics 2023 : पियरे अगोस्टिनी, फेरेंक क्रॉझ, ॲन एल हुलियर ठरले नोबेलचे मानकरी
  3. Earthquake tremors in North India : नेपाळ, दिल्लीसह उत्तर भारतात भूकंपाचे धक्के

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details