हैदराबाद Ramoji Film City : हैदराबादच्या जगप्रसिद्ध रामोजी फिल्मसिटीमध्ये नवीन वर्षाचं स्वागत जल्लोषात करू इच्छिणाऱ्यांसाठी खास तयारी करण्यात आली आहे. ३१ डिसेंबरला फिल्मसिटीमध्ये खास सेलिब्रेशन होईल. यासाठी फिल्मसिटीनं पर्यटकांना आमंत्रित केलं आहे. तुम्ही तुमचे मित्र, कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकांसह या उत्सवाचा आनंद घेऊ शकता. ३१ तारखेला आयोजित या विशेष सेलिब्रेशनमध्ये तुम्ही 'रेड वेल्वेट' आणि 'थ्रिल ब्लास्ट पार्ट्यां'मध्ये सहभागी होऊन नवीन वर्षाचं स्वागत धूमधडाक्यात करू शकता. यासह रामोजी फिल्म सिटीमध्ये राहण्यासाठी खास हॉलिडे पॅकेजेसही उपलब्ध आहेत
रेड वेल्वेट पार्टीचं ठिकाण - सन फाउंटन :नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनचा एक भाग म्हणून पर्यटक लाइव्ह म्युझिक परफॉर्मन्स, बॉलीवूड डान्स, डीजे, इंटरनॅशनल स्टंट्स, फायर अॅक्ट्स आणि स्टँड-अप कॉमेडीचा आनंद घेऊ शकतात. उत्साहानं भरलेल्या या सेलिब्रेशनचामध्ये एक शानदार बुफे डिनर आणि अमर्यादित पेयांचाही समावेश आहे. रेड वेल्वेट पार्टीची निवड करणारे पर्यटक सकाळी फिल्मसिटीला भेट देऊन सिनेमाच्या जगाचा फेरफटका मारू शकतात. या दरम्यान ते विशेष मनोरंजन कार्यक्रम, लाइव्ह शो, राइड्स, निसर्गाच्या कुशीतील पक्षी उद्यान आणि फुलपाखरांच्या जंगलाची भेट इत्यादींचा आनंद घेऊ शकतात.