महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

New Parliament Inauguration: संसद भवन उद्घाटनादिवशीच दिल्ली परिसराच्या सीमा सील, नेमके कारण काय?

संसद भवनाचे आज उद्घाटन होणार असताना नवी दिल्ली परिसराची सीमा सील करण्यात आली आहे. महिला कुस्तीपट्टूंनी महापंचायतीचे आयोजन जाहीर केले असताना त्यांना पाठिंबा मिळू नये, यासाठी दिल्ली पोलिसांनी ही विशेष तयारी केली आहे.

New Parliament Inauguration New Delhi border sealed
दिल्ली परिसराच्या सीमा सील

By

Published : May 28, 2023, 8:56 AM IST

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करणार आहेत. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी दिल्ली पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने जय्यत तयारी केली आहे. नवी दिल्ली जिल्ह्यातील सर्व रस्ते पहाटे 5.30 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत सर्वसामान्यांसाठी बंद राहतील. केवळ सार्वजनिक वाहतूक, नागरी सेवा परीक्षेचे विद्यार्थी , स्थानिक रहिवासी आणि आपत्कालीन वाहनांना जाण्याची परवानगी असणार आहे.

जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपट्टूंना पाठिंबा देण्यासाठी खाप पंचायतीचे आयोजित करण्यात येणार आहे. खाप पंचायतीचे आयोजन होऊ नये यासाठी दिल्ली पोलिसाकडू कसोशीने प्रयत्न होणार असल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. खाप पंचायतीसाठी दिल्ली पोलिसांकडून परवानगी देण्यात आलेली नाही. नवी दिल्ली जिल्ह्यात 20 हून अधिक कंपन्या तैनात केल्या जातील, ज्यामध्ये 10 हून अधिक महिला कंपन्या असणार आहेत. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संसदेजवळील मेट्रो स्टेशन आज रोजी बंद राहणार आहेत. हे मेट्रो स्टेशन बंद ठेवण्यासाठी पोलिसांनी दिल्ली मेट्रोला पत्र लिहिले आहे.

दिल्ली सीमेवर बॅरिकेड लावण्यात येणार :महिला खाप पंचायतीच्या समर्थनार्थ उत्तर प्रदेश आणि हरियाणातील शेतकरी दिल्लीत येण्याचा प्रयत्न करणार असल्याचा पोलिसांचा दावा आहे. . सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, किमान 12 खाप पंचायतींचे सुमारे 5,000 लोक दिल्लीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार आहेत. यासंदर्भात गुरुवारी अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक झाली. शेतकऱ्यांनी दिल्लीत प्रवेश करू नये यासाठी दिल्लीच्या सर्व सीमेवर बॅरिकेड लावण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. त्यासाठी दिल्ली प्रशासनाकडून अतिरिक्त जवान तैनात करण्यात येणार आहेत.

हे रस्ते राहणार बंद- मदर तेरेसा क्रिसेंट रोड, तालकटोरा गोल चक्कर, बाबा खरकसिंग रोड, गोल डाक खाना, अशोक रोड, पटेल चौक गोल चक्कर, विंडसर प्लेस, जनपथ, अकबर रोड, तीन मूर्ती मार्ग यावरील वाहतूक बंद राहणार आहे. जंतरमंतरवर भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात महिनाभरापासून निदर्शने करणाऱ्या कुस्तीपट्टू आणि त्यांच्या समर्थकांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी संसद भवनासमोर महापंचायत भरवण्याची योजना आखली आहे. या योजनेवर पाणी फिरविण्यासाठी पोलिसाकडून प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनीही नवीन संसदेविरोधात आणि आत सेंगोल बसवण्याविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. एकूणच, हा कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित करण्याची संपूर्ण जबाबदारी दिल्ली पोलिसांवर आलेली आहे. त्यामुळे आंदोलकांना रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांसह दिल्ली पोलिसांनी संपूर्ण योजना तयार केलेली दिसून येत आहे.

हेही वाचा-

  1. Old Parliament House: जुनी संसद ठरली लोकशाहीतील ऐतिहासिक क्षणांची साक्षीदार, आज देश अनुभवणार नवा बदल
  2. Wrestlers Protest: कुस्तीपट्टू नवीन संसदभवनासमोर करणार महिला पंचायतीचे आयोजन, समर्थकांना रोखले जात असल्याचा आरोप
  3. new parliament building inauguration : सर्वधर्मीयांच्या प्रार्थनेला पंतप्रधान मोदी, कॅबिनेट मंत्री उपस्थित

ABOUT THE AUTHOR

...view details