नवी दिल्ली : एअर इंडिया एक्सप्रेसने कोची मुजिरिस बिएनलेमध्ये विकसित आणि एका बोईंग ७३७ - ८०० एअरक्राफ्टवर इन्स्टॉल करण्यात आलेल्या नव्या टेल आर्टचे अनावरण केले आहे. हा सोहळा केरळचे सार्वजनिक कामे आणि पर्यटन विभागाचे माननीय मंत्री पी. ए. मोहम्मद रियास, एअर इंडिया एक्सप्रेसचे सीईओ आणि एअर एशिया इंडियाचे प्रेसिडेंट आलोक सिंह व कोची बिएनले फाऊंडेशनचे प्रेसिडेंट बोस कृष्णमाचारी यांच्या हस्ते पार पडला.
२५ फूट लांब टेल आर्टमध्ये रूपांतरित : कलाकार जीएस स्मिता यांच्या मूळ ऍक्रेलिक पेंटिंगला २५ फूट लांब टेल आर्टमध्ये रूपांतरित करण्यात आले आहे. या चित्रामध्ये स्मृती विमानांमार्फत एक समांतर कालरेखा दर्शवली गेली आहे. यामध्ये सरडा, हिरवे नाकतोडे, सूक्ष्मजीव आणि जलीय जीवांनी भरलेले रंगीत लँडस्केप साकारण्यात आले आहे. या मेटाफिजिकल पेंटिंगमध्ये छोट्या जीवांचे लहानसे विश्व आणि डोंगर, फुलापानांचे विशाल जग एकाच ठिकाणी प्रदर्शित करण्यात आले आहे. हा समारंभ थिरुवनंतपूरम आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एअर इंडिया इंजिनीयरिंग सर्व्हिसेस येथे पार पडला.
आर्टवर्क्स एअरक्राफ्ट्सच्या टेल्सवर प्रदर्शित करण्याची परंपरा : देशातील कला आणि संस्कृती यांच्याप्रती वचनबद्ध एअर इंडिया एक्सप्रेसमध्ये समृद्ध भारतीय संस्कृती व वारसा दर्शवणारे, अद्वितीय आर्टवर्क्स एअरक्राफ्ट्सच्या टेल्सवर प्रदर्शित करण्याची परंपरा प्रदीर्घ काळापासून आहे. एअर इंडिया एक्सप्रेसची कोची-मुजर बिएनले यांची भागीदारी कला आणि एव्हिएशन यांचा सुंदर मिलाप आहे आणि कोची बिएनलेच्या कलाकारांनी साकारलेले टेल आर्ट या भागीदारीचे एक अमूल्य प्रतीक आहे. आशिया खंडातील सर्वात मोठा समकालीन कोची-मुजिरिस बिएनले कला महोत्सव डिसेंबर २०२२ मध्ये सुरु झाला आहे. हा उत्सव एप्रिल २०२३ पर्यंत चालेल. एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस या उत्सवाचे ऑफिशियल ट्रॅक्लपार्टनर्स आहेत.