नवी दिल्ली -निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी आज पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. यापूर्वीही दोघांची शरद पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट झाली होती. आता पुन्हा दोघांची भेट झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ असून अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. आगामी उत्तर प्रदेश राज्यातील विधानसभा निवडणूक आणि 2024 लोकसभा निवडणुकीची तयारी म्हणून या बैठकीकडे पाहिले जात आहे. दरम्यान, उद्या (मंगळवार) दुपारी ४ वाजता १५ राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत शरद पवार बैठक घेणार आहेत. यात सध्याची राजकीय आणि आर्थिक स्थितीवर सर्वांगिण चर्चा होणार असल्याचे वृत्त आहे. या बैठकीला मनिष तिवारी आणि शत्रुघ्न सिन्हा उपस्थित राहण्याची शक्यता नाही. खासगी कामामुळे बैठकीला उपस्थित राहता येणार नाही, असे त्यांनी कळविल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
शरद पवारांना भाजपाविरोधी आघाडीचे एक प्रमुख नेते म्हणून पाहिले जाते. 2024 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपाविरोधात मोठा विरोधी मोर्चा उभारण्याच्या रणनीतीवर ते बर्याच काळापासून काम करत आहेत. याबद्दल त्यांनी बर्याच वेळा जाहीरपणे भाष्य केले. पश्चिम बंगाल निवडणुकीत ममता बॅनर्जींनी भाजपाविरूद्ध मोठा विजय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या प्रशांत किशोर यांची त्यांनी दोनदा भेट घेतली आहे. त्यामुळे आता बंगाल मॉडल हे देशात किंवा राज्यांमध्ये लागू होऊ शकतं का? यावर चर्चा होत असल्याचे बोलले जात आहे.
मोदी सरकारच्या धोरणांच्या विरोधात राष्ट्र मंचच्या बैठकीपूर्वी पवार आणि किशोर यांच्यात ही बैठक झाली. मंगळवारी संध्याकाळी चार वाजता दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुखांच्या घरी राष्ट्र मंचाची बैठक होणार असल्याची माहिती आहे. या सभेला पवार पहिल्यांदा उपस्थित राहतील. पवार आणि यशवंत सिन्हा यांच्या व्यतिरिक्त विरोधी पक्षांचे काही नेते या बैठकीला हजेरी लावण्याची शक्यता आहे. राष्ट्र मंच हा एक राजकीय मंच नाही. परंतु भविष्यात यातून तिसरा पर्याय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण, त्यात सरकारविरोधात राजकारणासह अन्य मुद्द्यांवर चर्चा होत असते. पवार प्रथमच राष्ट्र मंचच्या बैठकीला उपस्थित राहतील.
काय आहे राष्ट्र मंच?
राष्ट्र मंचची स्थापना करणारे यशवंत सिन्हा आता टीएमसीचे उपाध्यक्ष आहेत. टीएमसीचे प्रतिनिधी आणि राष्ट्र मंचचे संस्थापक म्हणून सिन्हा या बैठकीत उपस्थित असतील. सन 2018 मध्ये सिन्हा यांनी देशाच्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक परिस्थितीबद्दल चर्चा करण्यासाठी राष्ट्र मंच सुरू केला होता. विरोधी पक्षांच्या नेत्यांव्यतिरिक्त, बिगर राजकीय लोकही यात सहभागी होत आहेत. केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात आवाज उठविणे हा राष्ट्र मंचचा उद्देश आहे.
यापूर्वी झाली होती भेट -