दौसा (राजस्थान) - खासदार शरद पवार शुक्रवारी दौसा जिल्ह्याच्या एक दिवसीय दौऱ्यावर आले होते. त्यांनी दौसा येथील एका खासगी शाळेचे उद्घाटन केले. या वेळी त्याच्या बरोबार खासदार प्रफुल्ल पटेल ही उपस्थित होते.
शरद पवार यांच्या हस्ते दौसा येथील शाळेचे उद्घाटन - शरद पवार यांच्या बद्दल बातमी
खासदार शरद पवार शुक्रवारी दौैसा जिल्ह्याच्या एक दिवसीय दौऱ्यावर आले होते. या वेळी त्यांच्या हस्ते एका खासगी शाळेचे उद्घाटन करण्यात आले.
या वेळी त्यांच्या हस्ते दौसा येथील खासगी शाळेच उद्घाटन करण्यात आले. यानंर झालेल्या कार्यक्रमात त्यांनी भाग घेतला. यावेळी बोलताना त्यांनी शाळेचे कौतुक केले. ते म्हणाले ही एक उत्तम शाळा आहे. मी देश-विदेशातील अनेक खासगी शाळांना भेटी दिल्या आहेत. त्यांच्या सारखीच ही एक सर्वोत्कृष्ट शाळा आहे. ही शाळा दौसा जिल्ह्यासाठी चांगले काम करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पत्रकारांनी त्यांना महाराष्ट्रातील घटानांबद्दल प्रश्न विचारले. त्यांना गृह मंत्र्यांचा राजीनामा आणि लहान मुलांच्या रुग्णालयातील मृत्यू बद्दल विचारण्यात आले. या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी गृह मंत्र्यांचा प्रश्न न्यायालयात आहे, या विषयी बोलने योग्य होणार नाही, असे म्हणत उत्तर देणे टाळले.