दंतेवाडा : छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांचा मोठा हल्ला झाला आहे. यामध्ये 11 जवान शहीद झाले आहेत. दंतेवाडा येथील अरणपूर येथे जिल्हा राखीव रक्षक दल (DRG) दलाच्या वाहनावर आयईडी हल्ला झाला. शहीद जवानांमध्ये 10 DRG सैनिक, एका ड्रायव्हरचा समावेश आहे. या हल्ल्याबाबत मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी प्रतिक्रिया दिली असुन, नक्षलवाद्यांना सोडले जाणार नाही असे म्हटले आहे.
कसा झाला नक्षलवादी हल्ला : हा नक्षलवादी हल्ला त्यावेळी झाला. जेव्हा जवान आपल्या सोबत्यांना मदत करण्यासाठी मिनी बसमधून जात होते. ही टीम पावसात अडकलेल्या सुरक्षा दलांना वाचवण्यासाठी जात असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळेच नक्षलवाद्यांनी बस आयडी ब्लास्टने उडवली. दंतेवाडा जिल्ह्यातील अरणपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अरणपूर आणि समेली येथे हा हल्ला झाला. त्यानंतर नक्षलवाद्यांनी घटनास्थळी गोळीबारही केला. जखमी जवानांना आणण्यासाठी चार रुग्णवाहिकाही घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत. घटनास्थळी एस.पी. आजूबाजूच्या परिसरात शोध सुरू आहे.
बस्तरचे आयजी सुंदरराज पी यांचे वक्तव्य : बस्तरचे आयजी सुंदरराज पी यांनी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, "ही घटना अरणपूरची आहे. हिडमाच्या माहितीवरून सुरक्षा दलाचे एक पथक येथे पाठवण्यात आले होते. नंतर DRG जवानांना त्यांच्या पाठिंब्यासाठी पाठवण्यात आले. या टीमला लक्ष्य करण्यात आले. नक्षलवाद्यांनी केला आणि आयडी ब्लास्टने उडवले. ज्यात 10 DRG जवान शहीद झाले. एका ड्रायव्हरचाही मृत्यू झाला. CRPF चे अतिरिक्त पथक रवाना झाले. घटनास्थळी सुरक्षा दलाच्या पथकाने पुढाकार घेतला"
सीआरपीएफ जवानांनी पदभार स्वीकारला:दंतेवाडा येथे नक्षलवादी हल्ल्यानंतर सीआरपीएफ जवानांनी घटनास्थळी पदभार स्वीकारला आहे. सीआरपीएफची टीम येथे पोहोचली आहे. ज्याचा परिसरात सतत शोध सुरू आहे.
हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांची नावे :या हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांमध्ये हेड कॉन्स्टेबल, जोगा सोधी, हेड कॉन्स्टेबल, मुन्ना राम कडती, हेडकॉन्स्टेबल संतोष तमो,हवालदार दुल्गो मांडवी, हवालदार लखमू मरकम, हवालदार जोगा कवासी, हवालदार हरिराम मांडवी, सैनिक राजू राम कर्तम, सैनिक जयराम पोडियम, सैनिक जगदीश कावासी, चालक धनीराम यादव यांचा समावेश आहे.
केंद्रीय गृहमंत्री सीएम बघेल यांच्याशी बोलले :केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दंतेवाडा नक्षलवादी हल्ल्यावर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याशी संपर्क साधत घटनेची माहिती जाणुन घेतली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सीएम बघेल यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
नक्षलवाद्यांना सोडणार नाही : ही घटना अत्यंत दु:खद आहे. नक्षलवाद्यांविरुद्धची आमची लढाई अंतिम टप्प्यात आहे. नियोजनबद्ध पद्धतीने नक्षलवाद खात्मा करण्यात येईल असे मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यानंतर पोलिसांनी नक्षलवाद्यांना घेरले आहे. दोघांमधील चकमक अजूनही सुरूच आहे. आणखी फोर्स मागवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्यपालांनी केला शोक व्यक्त :छत्तीसगडचे राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन यांनी घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. या प्रकणी त्यांनी एक ट्विट केले असुन दंतेवाडा जिल्ह्यातील अरनपूर भागात नक्षलवाद्यांनी केलेल्या स्फोटात पोलीस कर्मचार्यांच्या हौतात्म्याबद्दल निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी शहिद जवानांना ट्विटमधुन श्रद्धांजली वाहिली आहे." शहीद जवानांना अभिवादन करताना त्यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करत नक्षलवाद्यांचे देशविरोधी मनसुबे कधीही यशस्वी होणार नाहीत, असे असे म्हटले आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार समन्वयाने नक्षलवादाचा नायनाट करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले आहे.
याआधी झालेले नक्षलवादी हल्ले :