नवी दिल्ली -पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू ( Navjyot Singh Sidhu ) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 34 वर्षे जुन्या एका प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ( Navjyot Singh Sidhu sentenced to one year ) नवज्योतसिंग सिद्धूला एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने सिद्धूला या हत्येप्रकरणी तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.
नेमकं काय आहे प्रकरण -पार्किंगच्या जागेवरून नवज्योत सिद्धूचा एका व्यक्तीसोबत वाद झाला होता. त्यावेळी सिद्धूसोबत आणखी एक मित्र उपस्थित होता. दोघांवर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी 2006 मध्ये उच्च न्यायालयाने सिद्धूला दोषी ठरवले होते. तसेच सिद्धूला दंडही ठोठावण्यात आला होता. 2018मध्ये पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने सिद्धूला दोषी ठरवून 3 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.