नवी दिल्ली -महागाईसह देशातील महत्त्वाच्या मुद्यांवर काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. काँग्रेसने आज महागाईच्या विरोधात देशव्यापी आंदोलनाला ( Congress Agitation Against Inflation ) सुरुवात केली आहे. काँग्रेसच्या खासदारांनी संसद भवनासमोर आंदोलन केले. त्यानंतर राष्ट्रपती भवनापर्यंत काँग्रेसच्या खासदारांनी रॅली काढली आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी ( Congress president Sonia Gandhi ) आणि काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी ( Congress leader MP Rahul Gandhi ) या आंदोलनाचे नेतृत्व करीत आहेत.
संसद भवनासमोर निदर्शने - काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात संसद भवनासमोर काँग्रेसच्या खासदारांनी आंदोलन सुरू केले. या आंदोलनात काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित होते. काळा पेहराव करीत काँग्रेसने सरकारचा निषेध केला. माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसने नेते पी. चिदंबरम यांनी हे आंदोलन महागाई आणि अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ सुरू असल्याचे सांगितले.