चंदीगड हरियाणा राष्ट्रीय महिला आयोगाने भाजप नेत्या सोनाली फोगट यांच्या मृत्यूची Sonali Phogat death दखल घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आयोगाने दोन सदस्यांचे तथ्य शोध पथक तयार केले Women Commission on Sonali Phogat death आहे. यासंदर्भात महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा Rekha Sharma Chairperson of Women Commission यांनी गोव्याच्या डीजीपींना पत्रही लिहिले आहे. पत्रात गोव्याच्या डीजीपींना सोनाली फोगटच्या पोस्टमॉर्टम अहवालाची माहिती देण्यास सांगण्यात आले आहे.
सोनाली फोगटच्या बहिणीने उपस्थित केले प्रश्न सोनाली फोगट यांची बहीण रेमन फोगटने सांगितले की, सोनालीचे सोमवारी रात्री आईसोबत बोलणे झाले. ती म्हणाली होती की खाल्ल्यानंतर काहीतरी विचित्र जाणवत आहे. शरीरात हालचाल होत आहे. त्यानंतर आई म्हणाली की, डॉक्टरांकडे जा. बहिणीच्या म्हणण्यानुसार, सकाळी ८ वाजता सोनाली फोगटचा मृत्यू झाल्याचा फोन आला. रेमन फोगटने दिलेले हे विधान सोनाली फोगटच्या संशयास्पद मृत्यूकडे बोट दाखवत आहे. विशेष म्हणजे रेमन फोगट ही सोनाली फोगटची बहीण आहे. Sonali Phogat death is Suspicious
नवीन जयहिंद यांनीही मृत्यूवर प्रश्न उपस्थित केला आम आदमी पार्टी हरियाणाचे माजी प्रदेशाध्यक्ष नवीन जयहिंद यांनीही सोनाली फोगटच्या मृत्यूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ट्विट केले Naveen Jaihind on Sonali Phogat death आहे. नवीन जयहिंद यांनी सांगितले की, सोनाली फोगटचा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाला आहे. सोनाली फोगटच्या मृत्यूचा तपास सीबीआय किंवा उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींकडून करण्यात यावा आणि एम्समध्ये शवविच्छेदन करण्यात यावे, असे ते म्हणाले.