महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

National Herald Case: सोनिया गांधींचे ईडीला पत्र; चौकशीला हजर राहण्यासाठी वेळ देण्याची मागणी - सोनिया गांधी यांची तब्येत बातमी

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी बुधवारी (ता. २२) अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) पत्र (letter) लिहून एजन्सीसमोर हजर राहण्यासाठी आणखी काही आठवड्यांचा अवधी मागितला आहे. कोरोना व फुफ्फुसाच्या संसर्गातून आपण आत्ताच रुग्णालयातून बाहेर आलो आहोत. ( Sonia Gandhi wrote a letter to ED ) दरम्यान, आपल्याला आणखी काही दिवस आराम करण्याची गरज आहे. त्या पार्श्वभूमीवर आपल्याला काही दिवस चौकशीसाठी हजर राहता येणार नाही. तरी आपण मला काही दिवसांची वेळ द्यावी अशी विनंती त्यांनी केली आहे.

सोनिया गांधी
सोनिया गांधी

By

Published : Jun 22, 2022, 10:25 PM IST

नवी दिल्ली -काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी बुधवारी (ता. २२) अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) पत्र (letter) लिहून एजन्सीसमोर हजर राहण्यासाठी आणखी काही आठवड्यांचा अवधी मागितला आहे. कोरोना व फुफ्फुसाच्या संसर्गातून आपण आत्ताच रुग्णालयातून बाहेर आलो आहोत. ( Sonia Gandhi wrote a letter to ED ) दरम्यान, आपल्याला आणखी काही दिवस आराम करण्याची गरज आहे. त्या पार्श्वभूमीवर आपल्याला काही दिवस चौकशीसाठी हजर राहता येणार नाही. तरी आपण मला काही दिवसांची वेळ द्यावी अशी विनंती त्यांनी केली आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीकडून सोनिया गांधी यांना 23 जून रोजी चौकशीसाठी बोलावले होते.

कोरोना आणि फुफ्फुसाच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल झाल्यानंतर सोनिया गांधी यांना घरी विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी बुधवारी ईडीला (ED) पत्र लिहून पूर्णपणे बरी होईपर्यंत हजेरी काही आठवडे पुढे ढकलण्याची मागणी केल्याचे ट्विट काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केले आहे.

सोनिया गांधी यांना सोमवारी (ता. २०) दिल्लीतील खाजगी रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती. जिथे त्यांना कोरोना व्हायरसशी संबंधित गुंतागुंतींमुळे दाखल करण्यात आले होते. अंमलबजावणी संचालनालयाच्या तपासाला राजकीय सूडबुद्धी म्हणत काँग्रेसने तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधी पक्षनेत्यांना लक्ष्य केल्याचा आरोप केला आहे.

दुसरीकडे मंगळवारी पाचव्या दिवशी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची ११ तासांहून अधिक चौकशी करण्यात आली. तपास एजन्सीने राहुल गांधींना कोणतेही नवीन समन्स जारी केलेले नाही. असे मानले जात आहेत की काही काळासाठी त्यांची चौकशी संपली आहे. राहुल गांधी यांची पाच दिवसांत ५४ तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली आहे.

हेही वाचा -उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडला, हजारो शिवसैनिकांच्या डोळ्यात दाटलं पाणी

ABOUT THE AUTHOR

...view details