महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Nathuram Godse Birth Anniversary : हिंदू महासभेने साजरी केली नथुराम गोडसेची जयंती, कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापट

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे याच्या जयंतीनिमित्त पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. गोडसेच्या जयंतीनिमित्त हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी फळांचे वाटप केले. याची माहिती मिळताच मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी पोहोचला आणि त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. या वेळी हिंदू महासभेचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची झाली.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : May 19, 2023, 5:43 PM IST

ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) : महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसे याच्यामुळे ग्वाल्हेर अनेकदा चर्चेत असते. हिंदू महासभेचा गड मानल्या जाणाऱ्या ग्वाल्हेरमध्ये गोडसेच्या जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त बरेचदा कार्यक्रम आयोजित केले जातात. ग्वाल्हेरमध्ये हिंदू महासभेने शुक्रवारी नथुराम गोडसे याची जयंती साजरी केली. यावेळी हिंदू महासभेने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. महासभेचे कार्यकर्ते गरीब वस्त्यांमध्ये नथुराम गोडसेचे छायाचित्र घेऊन फळे वाटपासाठी गेले होते. याबाबतची माहिती मिळताच पोलीस सक्रिय झाले.

हिंदू महासभेचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वादावादी : हिंदू महासभेचा कार्यक्रम रोखण्यासाठी मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी पोहोचला होता. पोलिसांनी महासभेच्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांनी नथुराम गोडसेचे छायाचित्र जप्त करण्याचा प्रयत्न केला असता हिंदू महासभेचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वाद झाला. हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी नथुराम गोडसेचे छायाचित्र पोलिसांच्या ताब्यात दिले नाही. कार्यकर्त्यांनी गोडसेचे छायाचित्र घेऊन हिंदू महासभेचे कार्यालय गाठले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना गोडसेचा वर्धापनदिन कार्यालयातच साजरा करण्याची परवानगी दिली, पण बाहेर कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम करण्यास मनाई करण्यात आली आहे.

नथुराम गोडसे यांची जयंती असून त्यानिमित्त हिंदू महासभा एका कार्यक्रमाचे आयोजन करणार असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या या कार्यक्रमाबाबत अशी कोणतीही माहिती नाही. - कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी दामोदर गुप्ता

'गोडसेचे चित्र देशभरात लावण्याची मागणी' :हिंदू महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जयवीर भारद्वाज म्हणाले की, आज नथुराम गोडसेची जयंती आहे. यावेळी हिंदू महासभेने गरीब वस्त्यांमध्ये जाऊन फळांचे वाटप केले. संपूर्ण देशात नथुराम गोडसेचा पुतळा बसवण्यास परवानगी द्यावी, असे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे. गोडसे यांच्या जयंतीनिमित्त हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी फळे वाटप केली, मग यात कुणाला त्रास का? दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सिद्धार्थ राजावत यांच्या हिंदू महासभेवर बंदी घालण्याच्या वक्तव्यावर जयवीर भारद्वाज म्हणाले की, काँग्रेस प्रवक्त्याचे मानसिक संतुलन तपासले पाहिजे.

हेही वाचा :

  1. Fine On Bageshwar Baba : बिहार सरकारने बागेश्वर धाम बाबावर ठोठावला दंड, जाणून घ्या काय आहे कारण
  2. National Anti terrorism day 2023 : दहशतवाद विरोधी दिवस का साजरा केला जातो? जाणून घ्या त्याचा इतिहास आणि महत्त्व...
  3. Mobile Phone Exploded In Pocket : खिशात मोबाईलचा स्फोट होऊन लागली आग; वेळीच आग विझविल्याने वाचले प्राण

ABOUT THE AUTHOR

...view details