नालंदा - देशात अनेक वेळा हिंदू-मुस्लिम यांच्यातील जातीय तणावाची परिस्थिती पाहायला मिळत आहे. काही दिवसांपासून भोंगे हटवण्यापासून देशभरात वातावरण ढवळून निघाले आहे. काही ठिकाणी दंगली भडकवल्या जात आहेत. मात्र, भारत विविधतेने नटलेला आणि विविधता जपणारा, त्याचा आदर करणारा देश आहे हे वारंवार सिद्ध झालेले आहे. अशीच घटना आहे बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील एका गावची. येथील गावात हिंदू-मुस्लीम ऐक्याचे मोठे उदाहरण आपल्या समोर ठेवले आहे. (Mari Village In Bihar) येथील गावात एकही मुस्लिम कुटुंब नाही, पण इथल्या एका मशिदीत रोज पाच वेळा नमाज अदा केली जाते आणि अजानही दिली जाते हे आहेना आश्चर्य वाटण्यासारखेच -
बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील बेन ब्लॉकमधील माडी गावात फक्त हिंदू समाजाचे लोक राहतात. इथे एक मशीद आहे. तेव्हडेच नाही तर कुणीही मुस्लिम नसताना ही मशीद काही दुर्लक्षित झालेली नाही. परंतु, हिंदू समाज तिची योग्य काळजी घेतो. येथे पाचवेळा नमाज अदा करण्याची व्यवस्था आहे. (Hindus Take Care of Mosque in Nalanda) मशिदीची देखभाल, रंगरंगोटी आणि रंगकामाची जबाबदारीही हिंदूंनी उचलली आहे. गावात राहणारे हिंदू धर्माचे लोक बिनदिक्कतपणे आपल्या मंदिराप्रमाणे मशिदीची काळजी घेत आहेत.
मशिदीच्या स्वच्छतेची जबाबदारीगावातीलच बखोरी जमादार, गौतम प्रसाद आणि अजय पासवान यांच्यावर आहे. मशिदीमध्ये नियमानुसार साफसफाई, दुरुस्तीसोबतच रोज अजान दिली जाते. अजान न शिकल्यामुळे हिंदू धर्माच्या लोकांनी यावरही उपाय शोधला. या लोकांनी रेकॉर्डेड आजान देण्याची पद्दत समोर आणली आहे. या मशिदीत दररोज पाच वेळा अजान होते. मशिदीचे रंगरंगोटी असो वा बांधकाम असो, यात गावातील लोक कायम सहकार्य करतात.