महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Murder in Union Ministers House : केंद्रीय मंत्र्यांच्या घरात एकाची हत्या, मंत्र्याच्या मुलावर गंभीर आरोप - विनय श्रीवास्तवची हत्या

Murder in Union Ministers House : केंद्रीय राज्यमंत्री कौशल किशोर यांचा मुलगा विकास किशोर उर्फ ​​आशु यांच्या घरी त्याचा मित्र विनय श्रीवास्तवची हत्या झाली आहे. त्यामुळं विनयच्या कुटुंबियांनी तसंच शेजाऱ्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. (Serious allegations Against Vikash Kishore)

Murder in Union Ministers House
Murder in Union Ministers House

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 1, 2023, 7:39 PM IST

लखनऊMurder in Union Ministers House : राजधानी लखनौमधील दुबग्गा येथे केंद्रीय राज्यमंत्री कौशल किशोर यांचा मुलगा विकास किशोर याच्या घरी त्याचा मित्र विनय श्रीवास्तवची हत्या करण्यात आली होती. विनय श्रीवास्तवच्या डोक्यात गोळी लागली होती. त्याच ठिकाणाहून मंत्र्यांचा मुलगा विकास किशोरचं परवाना असलेलं पिस्तूल जप्त करण्यात आलं आहे. या घटनेपासून विनय श्रीवास्तवच्या घरी दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (Murder in union ministers house in India)

विकास किशोरवर गंभीर आरोप :विनय श्रीवास्तवच्या घराशेजारी राहणाऱ्या एका महिलेनंही विकास किशोरवर गंभीर आरोप केले आहेत. या संपूर्ण घटनेमागे विकास किशोर जबाबदार असल्याचा आरोप महिलेनं केला आहे. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा गांभीर्यानं तपास करावा. या संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी या महिलेनं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडं केली आहे. महिलेनं सांगितलं की, विकास किशोरची विनय श्रीवास्तवशी चांगली मैत्री होती. मात्र, तो आतापर्यंत त्याला भेटायला का आला नाही? विकास किशोर पिस्तुल सोडून घरी का गेला, असा प्रश्न महिलेनं उपस्थित केला आहे. या संपूर्ण घटनेमागं कारस्थान असल्याचं महिलेनं म्हटलं आहे. (Vikash Kishore)



विकास किशोरचं पिस्तूल घटनास्थळीच : विनय श्रीवास्तवचा धाकटा भाऊ विक्रांत श्रीवास्तवनं ईटीव्ही भारतला सांगितलं की, माझा भाऊ विनय श्रीवास्तव आणि विकास किशोर यांच्यात घट्ट मैत्री होती. माझा भाऊ विकास श्रीवास्तवसाठी काम करायचा. मात्र, घटना घडली तेव्हापासून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. विकास किशोरनं तिथंच पिस्तूल का सोडलं, हा पहिला प्रश्न आहे. तो कुठेही गेला तरी, भावाला सोबत घेऊन जायचा, काल तो भावाला का घेऊन गेला नाही? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. (Murder of Vinay Srivastava)

हेही वाचा -

  1. Little Girl Locked In House : चिमुकलीला घरात कोंडून ठेवणाऱ्या दाम्पत्यापैकी एकाला नागपूर विमानतळावरून अटक
  2. 19 Bangladesh People Arrested : बुधवार पेठेत अवैध राहणाऱ्या १९ बांगलादेशींच्या आवळल्या मुसक्या
  3. BJP Women Officer Murder : भाजपा महिला पदाधिकाऱ्याच्या हत्ये प्रकरणी माहिती देणाऱ्याला नागपूर पोलीस देणार एक लाखांचे बक्षीस

ABOUT THE AUTHOR

...view details