सुरत (गुजरात) : सुरत ते बेलीमोरा दरम्यान पहिली बुलेट ट्रेन चालवण्याचे लक्ष्य आहे. सुरत जिल्ह्यातून 48 किलोमीटरच्या मार्गावर धावणाऱ्या बुलेट ट्रेनच्या कामांना वेग आला आहे. एकूण 144.48 हेक्टर जमीन आणि 999 ब्लॉकचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे काम वेगाने सुरू असल्याचे आमच्या प्रतिनिधींना दिसून आले आहे. बुलेट ट्रेन सूरतमधील 28 गावांमधून जाणार आहे. मोठ्या मशनरीद्वारे सध्या या मार्गावर बोगदा खोदण्याचे काम सुरू आहे.
पार नदीवर बांधला जातोय पहिला पूल - मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्टसाठीचा पहिला पूल वलसाडमधील पार नदीवर बांधला जात आहे. या पुलासाठी 8 पूर्ण स्पॅन गर्डर बांधले जात आहेत. याचा व्हिडिओ रेल्वे मंत्रालयाने ट्विट केला आहे. गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातून जाणाऱ्या पार नदीवर हा पूल बांधला जात आहे. गुजरातमध्ये बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम जोरात सुरू आहे. सुरतच्या तापी नदीवरही पुलाचे काम सुरू आहे.
कुठपर्यंत आले काम? : सुरतसह दक्षिण गुजरातमधील इतर जिल्ह्यांमध्ये जमिनीपासून ५४ फूट उंचीवर बुलेट ट्रेन धावणार आहे. इतकेच नव्हे तर १८ मीटर उंच खांब, ०८ मीटर खोल पाया, ४ मीटर रुंद रस्ताही तयार केला जात आहे. सुरतहून बुलेट ट्रेन ४८ किलोमीटरच्या परिसरातून जाणार आहे. सध्या 12 किमी परिसरात पिलरचे काम करण्यात आले आहे. नवीन तंत्रज्ञानामुळे अतिवेगाने धावणारी बुलेट ट्रेन आरामदायी करण्यासाठी काम सुरू आहे.