लखनौ - देशात सध्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरु आहे. त्यात फोडोफोडीच्या राजकारणाला वेग आला आहे. या आठवड्यात भाजपाच्या 3 कॅबिनेट मंत्री आणि काही आमदारांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला होता. त्यातच आता मोठी बातमी समोर येत आहे. समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव ( Sp Mulayam Singh Yadav ) यांच्या सुनबाई अपर्णा यादव या भाजपात प्रवेश करणार असल्याची शक्यता ( Aparna Yadav may be Join BJP ) वर्तवली जात आहे.
अपर्णा यादव या मुलायमसिंह यादव यांचा मुलगा प्रतिक यादव यांच्या ( Aparna Yadav Pratik Yadav Wife ) पत्नी आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपर्णा यादव या भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. अपर्णा यादव यांनी 2017 साली समाजवादी पक्षाच्या तिकीटावरुन कैंट विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत भाजपाच्या रीटा बहुगुणा जोशी यांनी अपर्णा यादव यांचा दारुण पराभव केला होता.
तसेच, समाजवादी पक्षात राहून सुद्धा अपर्णा यादव या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक करताना दिसून आल्या आहेत. दरम्यान, अनेक नेते अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षात प्रवेश करत असताना अपर्णा यादव भाजपात गेल्यास समाजवादी पक्षाला मोठा धक्का बसू शकतो.