महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Mukhtar Ansari : माफिया मुख्तार अन्सारीला 'या' प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा, वयापेक्षा जास्त गुन्हे आहेत दाखल - अवधेश राय

32 वर्षे जुन्या खून प्रकरणात बाहुबली नेते व माजी आमदार मुख्तार अन्सारी यांना वाराणसीच्या न्यायालयाने दोषी ठरवले आहे. न्यायालयाने त्यांना जन्मठेप आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आली. या प्रकरणात मुख्तार अन्सारीसह इतर चार जण आरोपी आहेत.

Mukhtar Ansari
मुख्तार अन्सारी

By

Published : Jun 5, 2023, 3:47 PM IST

वाराणसी : उत्तर प्रदेशातील बाहुबली नेते मुख्तार अन्सारी यांच्यावरील खटल्याचा निकाल सोमवारी सुनावण्यात आला. 32 वर्षे जुन्या अवधेश राय हत्याकांडात वाराणसीच्या एमपी एमएलए न्यायालयाने निकाल दिला आहे. बांदा कारागृहात बंदिस्त असलेल्या मुख्तार अन्सारीला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून, यासोबतच एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. मुख्तार यांना आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले.

आज आमची अनेक वर्षांची प्रतिक्षा आज संपली आहे. मी, माझे आई - वडील, अवधेश राय यांची मुलगी आणि संपूर्ण कुटुंबाने संयम राखला होता. मुख्तार अन्सारीपुढे आम्ही झुकलो नाही. सरकारे आली आणि गेली, मात्र आम्ही हार मानली नाही. आमच्या आणि आमच्या वकिलांच्या इतक्या वर्षांच्या प्रयत्नांमुळे आज कोर्टाने मुख्तारला माझ्या भावाच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवलं आहे. आता मुख्तार अन्सारीला योग्य शिक्षा होईल, अशी अपेक्षा आहे.- अजय राय, अवधेश राय यांचे भाऊ आणि माजी आमदार

32 वर्षे जुने प्रकरण : अवधेश राय यांचे धाकटे भाऊ अजय राय सध्या काँग्रेसचे प्रांतीय अध्यक्ष आहेत. वाराणसीच्या चेतगंज पोलीस स्टेशन हद्दीतील लहुराबीर परिसरात 3 ऑगस्ट 1991 रोजी हे हत्याकांड घडले होते. त्या दिवशी अवधेश राय यांच्यावर व्हॅनमधून आलेल्या हल्लेखोरांनी अचानक गोळीबार केला. यामध्ये अवधेश राय यांना अनेक गोळ्या लागल्या. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणात माजी आमदार अजय राय यांनी मुख्तार अन्सारी यांना मुख्य आरोपी बनवले होते. याशिवाय भीम सिंग, कमलेश सिंग, मुन्ना बजरंगी, माजी आमदार अब्दुल कलाम आणि राकेश न्यायमूर्ती आदींचाही आरोपींमध्ये समावेश होता.

मुख्तार अन्सारीवर एकूण 61 गुन्हे दाखल आहेत :मुख्तार अन्सारी हे उत्तर प्रदेशातील मोठे बाहुबली नेते आहेत. त्यांचा जन्म 30 जून 1963 रोजी झाला. सध्या ते 60 वर्षांचे आहेत. विशेष म्हणजे त्यांचे जितके वय आहे तेवढे गुन्हे त्यांच्यावर नोंदवले गेले आहेत. त्यांच्यावर सध्या 61 गुन्ह्यांची नोंद आहे. मुख्तार अन्सारी 1996 मध्ये पहिल्यांदा बहुजन समाज पक्षाच्या तिकिटावर मऊच्या सदर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकत आमदार झाले. यानंतर त्यांनी बसपा सोडली आणि 2002 मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभेची निवडणूक जिंकली. 2007 मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवत ते आमदार झाले.

5 वेळा आमदार राहिले आहेत : यानंतर 2012 मध्ये मुख्तार अन्सारी यांनी कौमी एकता दलाची स्थापना केली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मुख्तार अन्सारी यांनी वाराणसीमधून नरेंद्र मोदींविरोधात निवडणूक लढवली होती. त्यात त्यांना विजय मिळाला नाही, मात्र त्यांनी आपली ताकद नक्कीच दाखवून दिली होती. या निवडणुकीनंतर 2017 मध्ये मुख्तार अन्सारी यांनी कौमी एकता दलाचे बसपामध्ये विलीनीकरण केले. मुख्तार अन्सारी यांनी 1996, 2002, 2007, 2012 आणि पुन्हा 2017 मध्ये मऊ येथून विधानसभा निवडणूक जिंकली होती.

विविध गुन्ह्यांमध्ये शिक्षा झाली आहे : उत्तर प्रदेशच्या पूर्वांचल भागात मुख्तार अन्सारीविरुद्ध विविध पोलिस ठाण्यात एकूण 61 गुन्हे दाखल आहेत. यातील 8 गुन्हे हे कारागृहात असताना दाखल झालेले आहेत. यातील बहुतांश प्रकरणे खुनाशी संबंधित असून बहुतांश प्रकरणे गाझीपूर या त्यांच्या गृहजिल्ह्यातील आहेत. मुख्तार अन्सारी विरुद्ध पहिला खटला 1996 मध्ये दाखल झाला होता. यामध्ये त्यांना 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. 2007 मध्ये त्यांच्यावर दुसरा गुन्हा दाखल झाला होता. ज्यामध्ये त्यांना 10 वर्षांची शिक्षा आणि 5 लाखांचा दंड सुनावला होता. 15 डिसेंबर 2022 रोजी मुख्तार अन्सारी यांना काँग्रेस नेते अजय राय यांचा मोठा भाऊ अवधेश राय आणि अतिरिक्त एसपी यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. मुख्तार अन्सारी यांना 29 एप्रिल 2023 रोजी गाझीपूरच्या खासदार आमदार न्यायालयात दोन प्रकरणांमध्येही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा :

  1. Mafia Mukhtar Ansari : माफिया मुख्तार अन्सारी 14 वर्षे जुन्या खुनाच्या प्रकरणातून निर्दोष मुक्त

ABOUT THE AUTHOR

...view details