महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Mukhtar Ansari convicted माफिया डॉन मुख्तार अन्सारीला दोन वर्षांचा कारावास - मुख्तार अन्सारीला दोन वर्षांचा कारावास

लखनौ : उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने माफिया डॉन मुख्तार अन्सारी याला राजधानीतील आलमबाग पोलीस ठाण्यातील एका गुन्हेगारी प्रकरणात दोषी ठरवले ( mukhtar ansari convicted ) आहे. न्यायालयाने त्याला दोन वर्षांची शिक्षा ( Mukhtar Ansari Punishment to two years ) सुनावली.

Mukhtar Ansari convicted
Mukhtar Ansari convicted

By

Published : Sep 21, 2022, 2:13 PM IST

लखनौ : उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने माफिया डॉन मुख्तार अन्सारी याला राजधानीतील आलमबाग पोलीस ठाण्यातील एका गुन्हेगारी प्रकरणात दोषी ठरवले ( mukhtar ansari convicted ) आहे. न्यायालयाने त्याला दोन वर्षांची शिक्षा ( Mukhtar Ansari Punishment to two years ) सुनावली.

न्यायमूर्ती दिनेश कुमार सिंह यांच्या एकल खंडपीठाने हा निर्णय दिला. 2003 मधील प्रकरणात तत्कालीन जेलर एस. के. अवस्थी यांनी मुख्तारविरुद्ध आलमबाग पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. त्यानुसार तुरुंगात मुख्तार अन्सारीला भेटण्यासाठी आलेल्या लोकांचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्याचवेळी शिवीगाळ करताना मुख्तारने पिस्तूलही दाखवले होते. या प्रकरणात ट्रायल कोर्टाने मुख्तारची निर्दोष मुक्तता केली होती. या निर्णयाच्या विरोधात सरकारने अपील दाखल केले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details