महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

IAF aircraft crash : वायुसेनेच्या अपघातग्रस्त विमानांचे ब्लॅक बॉक्स, कळणार नक्की कसा झाला अपघात.. - नक्की कसा झाला विमानांचा अपघात

मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यात कोसळलेल्या 'मिराज 2000'चा ब्लॅक बॉक्स आणि राजस्थानातील भरतपूरमध्ये जाऊन पडलेल्या 'सुखोई-30 MKI' विमानाच्या फ्लाइट डेटा रेकॉर्डरचा काही भाग विमानाच्या ढिगाऱ्यातून सापडला आहे. एका अधिकाऱ्याने रविवारी ही माहिती दिली.

MP Aircraft Crash: Mirage-2000 plane's black box And part of Sukhoi-30 data recorder found
वायुसेनेच्या अपघातग्रस्त विमानांचे ब्लॅक बॉक्स, फ्लाईट डेटा रेकॉर्डर सापडले, कळणार नक्की कसा झाला अपघात..

By

Published : Jan 29, 2023, 2:06 PM IST

Updated : Jan 29, 2023, 2:35 PM IST

मुरैना (मध्यप्रदेश): शनिवारी, भारतीय वायुसेनेचे (IAF) 2 फ्रंटलाइन लढाऊ विमान एमपीच्या मुरेना येथे प्रशिक्षण मोहिमेदरम्यान क्रॅश झाले. परिणामी विंग कमांडरचा मृत्यू झाला, तर इतर दोन पायलट सुरक्षितपणे बाहेर पडले. या अपघातानंतर ‘मिराज २०००’ या लढाऊ विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला आहे. तर ‘सुखोई-३०’ विमानाच्या फ्लाईट डेटा रेकॉर्डरचा काही भाग अवशेषातून सापडला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुरैना आणि भरतपूरमधील अवशेष: संरक्षण तज्ञांनी म्हटले आहे की 'रशियन-डिझाइन केलेले 'सुखोई-30 एमकेआय' जेट आणि फ्रेंच 'मिराज-2000' यांच्यात मध्य-हवेत टक्कर झाली असण्याची शक्यता आहे. परंतु वायुदलाने कोणतीही अधिकृत टिप्पणी दिली नाही. मुरैनाचे जिल्हाधिकारी अंकित अस्थाना यांनी शनिवारी सांगितले की, दोन्ही विमानांचे अवशेष जिल्ह्यातील पहाडगड भागात पडले आहेत. मध्य प्रदेशच्या सीमेला लागून असलेल्या राजस्थानमधील भरतपूरमध्येही काही अवशेष पडल्याचे त्यांनी सांगितले होते.

मिराजचा ब्लॅक बॉक्स पहाडगडमध्ये सापडला: मुरैना येथील पहाडगड परिसरात अवशेषांमधून मिराज विमानचा ब्लॅक बॉक्स सापडला आहे. ब्लॅक बॉक्स, किंवा फ्लाइट डेटा रेकॉर्डर, एक इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डिंग डिव्हाइस आहे जे विमानात बसवले जाते आणि उड्डाण अपघातांच्या तपासात मदत करण्यासाठी वापरले जाते. मुरैनाचे पोलिस अधीक्षक आशुतोष बागरी यांनी वृत्तसंस्थेला फोनवरून सांगितले की, सुखोई विमानाच्या ब्लॅक बॉक्सचा एक भाग देखील सापडला आहे आणि रेकॉर्डरचा उर्वरित भाग भरतपूरमध्ये पडला असावा. हवाई दल, पोलीस आणि इतर विभाग सुखोई विमानाच्या रेकॉर्डरचा उर्वरित भाग शोधत आहेत, असे ते म्हणाले.

मिराज आणि सुखोई पहिल्यांदाच टक्कर होऊन पडले: अधिकाऱ्यांनी यापूर्वी सांगितले होते की, अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मिराज विमानाचे पायलट विंग कमांडर हनुमंत राव सारथी यांचा अपघातात मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले होते. सुखोई विमानाचे दोन पायलट बाहेर पाडण्यात यशस्वी झाले आणि त्यांना लष्करी रुग्णालयात नेण्यात आले. उड्डयन तज्ज्ञांच्या मते, भारतीय हवाई दलाच्या टक्करीत हरवलेले पहिले मिराज 2000 तसेच सुखोई-30MKI हे दुसरे विमान होते. SU-30MKI हे ट्विन-सीटर कॉम्बॅट जेट आहे, तर मिराज 2000 हे फ्रेंच एरोस्पेस प्रमुख डसॉल्ट एव्हिएशनद्वारे निर्मित सिंगल-सीटर विमान आहे. दोन्ही विमानांनी ग्वाल्हेर एअर फोर्स स्टेशनवरून उड्डाण केले, तळावर सुखोई-३०एमकेआय आणि मिराज २००० जेट या दोन्हींचे स्क्वॉड्रन आहेत.

हेही वाचा: IAF Fighter Jets Crashed वायूसेनेच्या दोन विमानांचा अपघात एक मध्यप्रदेशात तर दुसरे पडले राजस्थानात एक वैमानिक ठार

Last Updated : Jan 29, 2023, 2:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details