लखनऊ ( उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशच्याराजधानीतील ठाकूरगंज पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या शांतीनगरमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. दत्तक घेतलेल्या ६ वर्षांच्या निष्पाप मुलीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये उकळते तेल ओतले ( Mother burns daughter private part in lucknow ) आहे. यामुळे निष्पाप मुलगी गंभीररित्या भाजली आहे. या घटनेनंतर महिलेच्या पतीने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ठाकूरगंजच्या निरीक्षकांनी सांगितले की, आरोपी महिलेला अटक केली आहे.
लखनऊच्या कॅम्पबेल रोड येथे खस्ता दुकान सुरू करणाऱ्या तिच्या वडिलाने सांगितले की, त्यांना मूलबाळ नाही. यामुळे 7 फेब्रुवारी 2022 रोजी राणी (नाव बदललेले) या 6 वर्षाच्या मुलीला दत्तक घेतले. 8 जुलै रोजी ते दुकानात असताना त्यांची मुलगी भाजल्याचे त्यांना समजले. घरी जाताना बायकोने सांगितले की चुकून चहा तिच्यावर पडला. मुलीने वडिलांना सांगितले की, आईने कढईत उकळत असलेले तेल चिमट्याने तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये टाकले होते. वडिलांनी सांगितले की, ही बाब समोर येताच त्याची पत्नी तिच्या माहेरच्या घरी गेली.