निलगिरीस ( तामिळनाडू ) : विवाहबाह्य संबंध वाचवण्यासाठी आपल्या एक वर्षाच्या चिमुरड्याची हत्या करणाऱ्या आईला पोलिसांनी अटक केली. ह्या निर्दयी आईने मुलाला बेदम मारहाण करत दारू पाजली. त्यामुळे गुदमरून मुलाचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे.
Mother Killed Her Own Child : संतापजनक, अनैतिक संबंध वाचवण्यासाठी आईनेच केली मुलाची हत्या.. - अनैतिक संबंध वाचवण्यासाठी आईकडून मुलाची हत्या
अनेक विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या महिलेने तिच्या अवघ्या एक वर्षाच्या मुलाचा जीव घेतला. तामिळनाडूतील निलगिरीस भागात ही घटना घडली. मुलाचा जीव घेण्यासाठी तिने मुलाला बेदम मारहाण करून दारुही पाजल्याचे आता उघड झाले आहे.
आरोपी आई अटकेत : विवाहबाह्य संबंध ठेवण्यासाठी आपल्या मुलाची हत्या केल्याच्या आरोपाखाली 38 वर्षीय महिलेला उटी बी1 पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "गेल्या महिन्यात 14 तारखेला उटी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात मुलाचा मृत्यू झाला. आईने सांगितले की, बाळाला आरोग्याच्या समस्या होत्या. परंतु, मुलाच्या शरीरावर कोणत्याही जखमा नाहीत. त्यामुळे या मृत्यूबाबत पोलिसांना शंका निर्माण झाली होती. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली. पोलीस तपासात अनेक धक्कादायक सत्य समोर आले.
सोशल मीडियाच्या माध्यमातून होते अनेक अफेअर्स : गैरसमजातून आरोपीने महिलेने तिच्या पतीला सोडले होते. त्यानंतर तिचे एका पुरुषासोबत विवाहबाह्य संबंध होते आणि तिने त्याच्याशी लग्नही केले. त्याशिवाय, सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचे अनेक बेकायदेशीर अफेअर्स होते. या सर्व बेकायदेशीर अफेअर्समुळे ती नेहमी सोशल मीडियावर व्यस्त असायची. त्यामुळे तिला तिचे एक वर्षाचे मुल तिच्या आयुष्यात अडथळा वाटत होते. त्यामुळे आरोपीने मुद्दाम मुलाची हत्या केली. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, तिने मुलाला बेदम मारहाण केली आणि खूप अन्न आणि दारू पाजली. त्यामुळे गुदमरून मुलाचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे."