बंगळुरु (कर्नाटक)Mother Daughter Death Case: एका दुःखद घटनेत आई आणि मुलीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. बंगळुरुमधील कडुगोडी येथे रविवारी सकाळी ही घटना घडली. (Two killed by lightning) आई सौंदर्या (23) आणि 9 महिन्यांच्या मुलीचा यात मृत्यू झाला. फुटपाथवर पडलेल्या विजेच्या तारेवर पाऊल ठेवताच सौंदर्याला विजेचा धक्का बसला. त्यामुळे दोघांचाही जागीच मृत्यू झाला. कडूगोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( husband injured by lightning)
पत्नीला वाचवताना पती भाजला:ए के गोपालन कॉलनीत सौंदर्या आणि तिचा पती संतोष राहत होते. तो दिवाळीसाठी चेन्नईला गेला होता आणि आज बंगळुरुला परतत होता. दरम्यान, आपल्या मुलीला मांडीवर घेऊन निघालेल्या सौंदर्याचा अंधारात चुकून विद्युत तारेवर पाय पडला. संतोषने पत्नी आणि मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला; पण तो वाचवू शकला नाही. बचाव करताना विजेचा धक्का लागल्याने संतोषचा हात भाजला असून त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या संबंधित सहाय्यक अभियंता चेतन, कनिष्ठ अभियंता राजन्ना आणि स्टेशन ऑपरेटर मंजुनाथ यांची काडूगोडी पोलीस चौकशी करत आहेत. कडुगोडी पोलीस ठाण्यात आयपीसी कलम 304A (निष्काळजीपणामुळे मृत्यू) अंतर्गत आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
काय म्हणाले पोलीस अधिकारी:व्हाईट फील्ड डिव्हिजनचे डीसीपी डॉ. शिवकुमार गुणारे यांनी सांगितले की, 'तामिळनाडूहून बंगळुरुला आलेली सुंदरा सकाळी ६ वाजता आपल्या मुलासह तिच्या घरी जात होती. अंधारात तिचे फूटपाथवरील तुटलेल्या विद्युत तारेवर पाऊल ठेवले. दरम्यान तिचा आणि तिच्या 9 महिन्याच्या मुलीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. बेस्कॉमचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत आहे.