महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

शुभवर्तमान! यंदा मान्सून सामान्य राहण्याचा स्कायमेटचा अंदाज! - हवामान

देशात यंदा चांगल्या मान्सूनचा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने वर्तविला आहे. देशात यंदा सरासरीच्या 103 टक्के पर्जन्यमानाचा अंदाज स्कायमेटने वर्तविला आहे.

शुभवर्तमान! यंदा मान्सून सामान्य राहण्याचा स्कायमेटचा अंदाज!
शुभवर्तमान! यंदा मान्सून सामान्य राहण्याचा स्कायमेटचा अंदाज!

By

Published : Apr 13, 2021, 2:52 PM IST

नवी दिल्ली : देशावर कोरोना संकटाचे सावट असताना एक दिलासादायक बातमी गुढी पाडव्याच्या मूहुर्तावर समोर आली आहे. देशात यंदा चांगल्या मान्सूनचा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने वर्तविला आहे. देशात यंदा सरासरीच्या 103 टक्के पर्जन्यमानाचा अंदाज स्कायमेटने वर्तविला आहे.

यंदा सरासरीच्या 103 टक्के पर्जन्यमान

देशात यंदा जून ते सप्टेंबर या मान्सूनच्या चार महिन्यांमध्ये एकूण सरासरीच्या 103 टक्के पर्जन्यमानाचा अंदाज स्कायमेटने वर्तविला आहे. यात 5 टक्के कमी वा अधिक होऊ शकतात. मान्सूनच्या चार महिन्यांपैकी सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा सर्वात जास्त पावसाचा अंदाज स्कायमेटने वर्तविला आहे. स्कायमेटचे अध्यक्ष जी पी शर्मा यांनी याविषयीची माहिती दिली आहे.

दुष्काळाची शक्यता शून्य टक्के

स्कायमेटच्या अंदाजानुसार यंदा देशात मान्सून सामान्य राहिल. यंदा दुष्काळाची शक्यता शून्य टक्के इतकी आहे. तर एकूण मान्सून कालावधीत सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यमानाची शक्यता 60 टक्के असल्याने पाऊस चांगलाच राहण्याची शक्यता आहे. मान्सूनच्या चार महिन्यांपैकी जूनमध्ये सरासरीच्या 106 टक्के पर्जन्यमानाचा, जुलैमध्ये सरासरीच्या 97 टक्के पर्जन्यमानाचा, ऑगस्टमध्ये सरासरीच्या 99 टक्के पर्जन्यमानाचा, तर सप्टेंबरमध्ये सरासरीच्या 116 टक्के पर्जन्यमानाचा अंदाज स्कायमेटने वर्तविला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details