नवी दिल्ली- कोरोना महामारीत लोकसभेचे दुसरे मान्सून अधिवेशन १९ जुलैला सुरू होणार आहे. हे अधिवेशन १३ ऑगस्टला समाप्त होण्याची शक्यता आहे.
महिनाभराच्या कालावधीत अधिवेशनाचे कामकाज २० दिवस सुरू राहिल, असे सुत्राने सांगितले. सामान्यत: मान्सून अधिवेशन हे जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होते. तर स्वातंत्र्यदिनापूर्वी संपते.
हेही वाचा-सुरक्षा दलाबरोबरील चकमकीत पुलवामामध्ये ४ दहशतवादी ठार
संसदीय व्यवहार समितीने अधिवेशनाच्या तारखाबाबत शिफारस केली होती. त्यानुसार १९ जुलैला लोकसभेचे मान्सून अधिवेशन सुरू होणार आहे. संसदेच्या अधिवेशनात कोरोनाच्या काळातील सर्व नियमांचे पालन केले जाणार असल्याचे सूत्राने सांगितले. संसदेच्या कॉम्पेक्समध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने लशीचा किमान एक तरी डोस घेतलेला असावा, असा विश्वासही सुत्राने व्यक्त केला आहे.
हेही वाचा-सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; चांदीच्या दरात घसरण
गतवर्षी अशी होती मान्सून अधिवेशनात व्यवस्था
राज्यसभेच्या सचिवालयाच्या नियोजनानुसार वरिष्ठ सभागृहातील सदस्य हे दोन्ही सभागृहाचे सदस्य हे चेंबर आणि गॅलरीमध्ये अधिवेशनादरम्यान बसले होते. संसदेच्या इतिहासात १९५२ नंतर प्रथमच अशी बैठक व्यवस्था करण्यात आली होती. चेंबरमध्ये ६० सदस्य बसण्याची व्यवस्था होती. तर राज्यसभेच्या गॅलरीत ५१ सदस्य बसण्याची व्यवस्था होती. तर उर्वरित १३२ सदस्य हे लोकसभेच्या चेंबरमध्ये बसण्याचे नियोजन होते. बैठक व्यवस्थेचे नियोजन हे लोकसभेच्या सचिवालयाकडून करण्यात आले होते. पहिल्यांदाच मोठे स्क्रिन, दोन्ही सभागृहामध्ये विशेष केबल आणि विभागणी करणारे पॉलिकार्बोनेट बसविण्यात आले होते.