नवी दिल्ली : मणिपूर मुद्द्यावरून सभागृहात विरोधकांचा गदारोळ सुरू झाला. यावेळी राज्यसभेच्या अध्यक्षांनी आप खासदार संजय सिंह यांना संपूर्ण पावसाळी अधिवेशनासाठी निलंबित केले. सभागृहाच्या कामकाजादरम्यान संजय सिंह अध्यक्षांच्या खुर्चीसमोर गेले आणि जोरात बोलू लागले. त्यानंतर संजय सिंह यांच्यावर टीका करण्यात येऊ लागली. संजय सिंह यांची ही कृती योग्य नाही. हे सभागृहाच्या नियमांच्या विरुद्धात असल्याचे पियुष गोयल म्हणाले. दरम्यान अध्यक्ष धनखड सतत संजय सिंह यांना त्यांच्या जागेवर जाण्यास सांगत होते. परंतु संजय सिंह ऐकत नव्हते. तेव्हा अध्यक्ष म्हणाले की, 'मी संजय सिंह यांचे नाव घेतो..' त्यानंतर अध्यक्ष म्हणाले की, मी संजय सिंह यांचे नाव घेत आहे. यानंतर राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनखड यांनी सभागृह नेते पियुष गोयल यांच्याकडे पाहण्यास सुरुवात केली त्यानंतर गोयल यांनी 'मी अध्यक्षांना विनंती करतो की, त्यांनी संजय सिंह यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली.
सत्यासाठी आवाज उठवल्याबद्दल संजय सिंह यांना निलंबित केले गेले. यामुळे आम्ही नाराज होणार नाही. आमची कायदेशीर टीम या प्रकरणाची चौकशी करेल, पण हे दुर्दैवी आहे. - आप नेते सौरभ भारद्वाज
गोयल यांनी मांडला प्रस्ताव : गोयल म्हणाले की, सरकार सभागृहात संजय सिंह यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव सादर करत आहे. त्यांना संपूर्ण पावसाळी सत्रासाठी निलंबित करण्यात यावे. त्यावर राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनखड यांनी गोयल यांना ठराव आणण्यास सांगितले. त्यावर गोयल म्हणाले की, संजय सिंह यांना संपूर्ण पावसाळी अधिवेशनासाठी निलंबित करण्यात यावे, असा प्रस्ताव आणत आहोत. त्यानंतर अध्यक्षांनी आप खासदार संजय सिंह यांना संपूर्ण पावसाळी अधिवेशनासाठी राज्यसभेतून निलंबित केले आहे. दरम्यान गोयल यांनी प्रस्ताव मांडल्यानंतर अध्यक्ष जगदीप धनखडांनी या प्रस्तावासाठी सभागृहाची मंजुरी मागितली. मंजुरी मिळाल्यानंतर संजय सिंह यांना, अध्यक्षांच्या निर्देशांचे वारंवार उल्लंघन केल्यामुळे निलंबित केले जात असल्याचे अध्यक्ष म्हणाले.
आधीही निलंबन झाले होते : मागील अधिवेशनातही आपचे खासदार संजय सिंह यांना ‘बेजबाबदारपणाच्या वागणुकीमुळे संसदेतून निलंबित करण्यात आले होते. मागील अधिवेशनादरम्यान त्यांनी अध्यक्षांवर कागद फेकल्याचे वाईट वर्तन केले होते. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले होते. संजय सिंह यांच्या निलंबनावर आप नेते सौरभ भारद्वाज यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा-
- Parliament Monsoon Session 2023 : लोकसभा-राज्यसभेचे कामकाज उद्यापर्यंत स्थगित
- Parliament Monsoon Session 2023 : संसदेचे पावसाळी अधिवेशन 'या' मुद्द्यांवरुन वादळी होण्याची शक्यता