महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Monsoon Update : पावसाची बातमी! भारतात या दिवशी दाखल होणार मान्सून, यंदा पाऊस..

भारतीय हवामान खात्याने या वर्षीच्या मान्सूनच्या आगमनाचा अंदाज वर्तवला आहे. 4 जून रोजी मान्सून केरळला पोहोचेल, असे आयएमडीचे म्हणणे आहे. यंदा मान्सून सामान्य राहील, असेही विभागाने सांगितले आहे.

Monsoon
मान्सून

By

Published : May 26, 2023, 6:24 PM IST

नवी दिल्ली : भारताच्या मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने (IMD) शुक्रवारी सांगितले की, या वर्षी मान्सून 4 जून रोजी केरळमध्ये दाखल होण्याची अपेक्षा आहे. तसेच या वर्षी मान्सून सामान्य होण्याची शक्यता आहे. आयएमडीने म्हटले आहे की, 'मान्सून 4 जूनच्या आसपास केरळमध्ये पोहोचेल अशी अपेक्षा आहे. 1 जूनपूर्वी मान्सून दाखल होण्याची शक्यता नाही. तसेच यंदा मान्सून सामान्य राहण्याची शक्यता आहे'.

वायव्य भारतात सामान्यपेक्षा कमी पावसाचा अंदाज : आयएमडीने असेही म्हटले आहे की, वायव्य भारतात आतापर्यंतच्या अंदाजानुसार, यावर्षी सामान्यपेक्षा कमी पाऊस पडेल. पुढील आठवडाभर अरबी समुद्रात चक्रीवादळ येण्याची शक्यता नाही. उत्तर पश्चिम भारतात आतापर्यंत सामान्यपेक्षा कमी पाऊस पडेल. आयएमडीने म्हटले आहे की, देशाच्या उत्तर भागात मान्सूनपूर्व पावसाचे कारण वेस्टर्न डिस्टर्बन्सचे हवामान आहे.

पावसाचे सर्वत्र समान वितरण होईल : आयएमडीने सांगितले की, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे आम्ही पाऊस आणि गडगडाटाच्या हालचाली पाहिल्या आहेत. त्यामुळे दिल्ली आणि आजूबाजूच्या शहरांमध्ये काहीसा दिलासा दिसत आहे. पावसाचे वितरण सर्वत्र सारखेच असेल तर ही एक आदर्श परिस्थिती असेल. कोणतीही अडचण येणार नाही. सर्वत्र समान वाटप झाले तर शेतीवर फारसा परिणाम होणार नाही. सध्या उत्तर पश्चिम भारतात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडेल.

आयएमडी 2005 पासून जारी करत आहे अंदाज :भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या मते, नैऋत्य मान्सून साधारणत: 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होत असतो. भारतीय हवामान विभाग (IMD) 2005 पासून केरळमध्ये मान्सून दाखल होण्याच्या तारखेचा अंदाज जारी करत आहे. गेल्या वर्षी केरळमध्ये मॉन्सूनचे आगमन 29 मे रोजी झाले होते. हवामान विभागाने मात्र 27 मे रोजी मान्सून दाखल होण्याचा अंदाज वर्तवला होता. IMD ने म्हटले आहे की, 2015 वगळता गेल्या 18 वर्षांमध्ये (2005-2022) केरळमध्ये मान्सून सुरू होण्याच्या तारखेचा त्यांचा अंदाज खरा ठरला आहे. भारताच्या मुख्य भूमीवर नैऋत्य मोसमी वाऱ्याने येणार मान्सून सर्वप्रथम केरळमध्ये दाखल होतो. त्यानंतर तो उत्तरेकडे प्रवास करतो.

हेही वाचा :

  1. Heavy Rain In Rajasthan : राजस्थानमध्ये वादळी पावसाचा कहर, 14 जणांचा मृत्यू ; हवामान विभागाने जारी केला अलर्ट

ABOUT THE AUTHOR

...view details