महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Swamy On Modi : स्वामींचा प्रहार! म्हणाले, पंतप्रधान मोदी आर्थिक विकासात अपयशी

भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याव निषाणा साधला आहे. ( Subramanian Swamy On Modi ) पंतप्रधान मोदी त्यांच्या गेल्या आठ वर्षांच्या कार्यकाळात आर्थिक विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यात अपयशी ठरले आहेत असा थेट आरोप करत, मोदी चीनबाबत 'अज्ञानी' आहेत असा घणाघात स्वामी यांनी केला आहे.

भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी Vs पंतप्रधान नरेंद्र मोदी
भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी Vs पंतप्रधान नरेंद्र मोदी

By

Published : Apr 19, 2022, 12:53 PM IST

नवी दिल्ली -भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रश्न उपस्थित केले आहेत. एका ट्विटमध्ये स्वामी म्हणाले की, गेल्या आठ वर्षांच्या कार्यकाळात मोदी आर्थिक विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यात अपयशी ठरले आहेत. तसेच, ( 2016)पासून आर्थिक वाढीचा दर दरवर्षी घसरला आहे अस निरिक्षणही त्यांनी नोंदवले आहे.

मोदी हे चीनबाबत विनाकारण अनभिज्ञ - याबरोबरच स्वामी यांनी सुरक्षेबाबतही प्रश्न उपस्थित केले आहेत. राष्ट्रीय सुरक्षाही कमकुवत झाली आहे. भारत-चीन संबंध पुन्हा रुळावर आणण्यास वाव असताना पंतप्रधान मोदी हे चीनबाबत विनाकारण अनभिज्ञ आहेत. ते कसे सोडवता येईल हे मोदींना माहीत आहे का? असा थेट प्रश्नच स्वामी यांनी उपस्थित केला आहे.

पंतप्रधान पदासाठी चांगला पर्याय नव्हता - मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा एका सोशल मीडिया वापरकर्त्याने त्यांना विचारले, की या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तुम्ही काय सुचवाल, तेव्हा स्वामी म्हणाले की, प्राचीन काळातील ऋषीमुनींनी सल्ला दिला होता की ज्यांच्याकडे ज्ञान आहे त्यांना ते दिले पाहिजे. परंतु त्यावेळी तसा पंतप्रधान पदासाठी चांगला पर्याय नव्हता असही स्वामी म्हणाले आहेत.

ब्रिटिश साम्राज्यवादी - एका युजरने लिहिले की मी तुमच्या कमेंटशी पूर्णपणे असहमत आहे. पंतप्रधानांच्या खुर्चीत दुसरे कोणी असते तर आमची अवस्था आतापेक्षा वाईट झाली असती, कदाचित पाकिस्तान किंवा श्रीलंकेसारखे आपण रडत बसलो असतो. दुसरे कुणी पंतप्रधान झाल्यानंतर पीएम मोदींचे महत्त्व लक्षात येईल. असही तो म्हणाला आहे. त्यावर प्रत्युत्तर देताना स्वामी म्हणाले की ब्रिटिश साम्राज्यवादी हेच म्हणाले होते- इंग्रज निघून गेले तर भारताचे तुकडे होतील.

हेही वाचा -Cryptocurrency : क्रिप्टोकरन्सीचा वापर दहशतवादाला वित्तपुरवठा करण्यासाठी होऊ शकतो -सितारामन

ABOUT THE AUTHOR

...view details