महाराष्ट्र

maharashtra

राजस्थानमध्ये मॉब लिंचिंग; रिक्षा चोरीच्या आरोपावरून तीघांना बेदम मारहाण

By

Published : Feb 22, 2021, 6:54 PM IST

अलवरमध्ये पुन्हा एकदा मॉब लिंचिंगचे प्रकरण समोर आले आहे. रिक्षा चोरीच्या आरोपावरून काही लोकांनी एका महिलेला आणि दोन पुरुषांना विद्युत खांबाला बांधून बेदम मारहाण केली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, पीडितांची सुटका केली.

मॉब लिंचिंग
मॉब लिंचिंग

अलवर - मॉब लिंचिंग घटनांसाठी बदनाम असलेल्या अलवरमध्ये पुन्हा एकदा मॉब लिंचिंगचे प्रकरण समोर आले आहे. रिक्षा चोरीच्या आरोपावरून काही लोकांनी एका महिलेला आणि दोन पुरुषांना विद्युत खांबाला बांधून बेदम मारहाण केली. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पीडितांना ताब्यात घेतले असून याप्रकरणी तपास सुरू केला आहे.

विद्युत खांबाला बांधून 3 जणांना मारहाण केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोरीने बांधलेल्या पीडितांची सुटक करत पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे.

संबंधित महिला आणि दोन पुरुषांना रिक्षा चोरी करताना आम्ही रंगेहाथ पकडलं. त्यांनी पळ काढू नये म्हणून विद्युत खांबाला बांधल्याचे स्थानिक लोकांनी सांगितले. या भागात रिक्षा चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. हे चोरटे असून त्यांनी अनेक रिक्षा चोरल्या आहेत, असे स्थानिकांनी पोलिसांना सांगितले. दरम्यान, पोलीस चोरट्यांना संरक्षण देत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

अलवरमध्ये मॉब लिंचिंगची ही पहिली घटना नाही. यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या आहेत. घटनास्थळी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. परंतु सर्व लोक व्हिडिओ शूट करत होते. कोणीही पीडितांना वाचविण्याचा प्रयत्न केला नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details