हैदराबाद तेलंगणामाजी क्रिकेटपटू मिताली राज यांनी शनिवारी हैदराबादमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट Mithali Raj Meets JP Nadda घेतली. भाजप अध्यक्षांची भेट घेतल्यानंतरच भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राज राजकीय डाव खेळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा तेलंगणा दौऱ्यावर आहेत. आज ते वारंगलमध्ये निवडणूक रॅलीला संबोधित करणार आहेत.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी माजी क्रिकेटपटू मितालीराज यांची शमशाबाद येथे नोव्हेटेल हॉटेलमध्ये भेट घेतली. जय प्रकाश नड्डा यांनी दिल्लीहून थेट विमानतळ गाठले आणि माजी महिला क्रिकेट लीजेंड मिताली राज यांची भेट घेतली.