हैदराबाद :जगभरातील संशोधकांच्या नजरा आज भारतावर खिळल्या आहेत. भारत आज चांद्रयान 3 ही मोहीम दुपारी 2.35 वाजता लाँच करणार आहे. चांद्रयान 3 ही मोहीम यशस्वी झाल्यास हे भारताचे सगळ्यात मोठे यश असेल. यापूर्वी भारताने चांद्रयान 2 ही मोहीम केली होती, मात्र दुर्दैवाने त्यात भारताला अपयश आले. मात्र चांद्रयान 2 आणि चांद्रयान 3 या मोहिमेत काय फरक आहे, याबाबतची माहिती ईटीव्ही भारतने जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
का आहे महत्त्वाचे मिशन चांद्रयान 3 :चांद्रयान 3 हे चांद्रयान 2 पेक्षा वेगळे कसे आहे, याबाबत ईटीव्ही भारतने मिशन चांद्रयानबद्दल रविशंकर विद्यापीठातील खगोल भौतिकशास्त्र विभागाचे वरिष्ठ सहाय्यक प्राध्यापक डॉ नंदकुमार चक्रधारी यांच्याशी बातचित केली आहे. प्राध्यापक नंदकुमार चक्रधारी यांनी भारतासाठी हे एक महत्त्वाचे मिशन असल्याचे स्पष्ट केले. जगाच्या नजरा भारताच्या या मोहिमेकडे लागल्या आहेत. या मोहिमेत आपण यशस्वी झालो तर भारतही चंद्रावर जाणाऱ्या देशांच्या यादीत सामील होईल. सध्या या देशांमध्ये अमेरिका, रशिया आणि चीन यांनी चंद्रयान मोहीम यशस्वी केली आहे.
चांद्रयान 3 चांद्रयान 2 पेक्षा कसे आहे आहे वेगळे :भारताने चांद्रयान 2 मोहीम लाँच केल्यानंतर त्यामध्ये अपयश आले. मात्र भारताने चांद्रयान 3 च्या मोहिमेची पुन्हा मोठ्या जोमाने तयारी केली आहे. चांद्रयान 3 हे चांद्रयान 2 चे प्रगत मॉडेल असल्याचे इस्रोच्या शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे. चांद्रयान 2 मध्ये अनेक त्रुटी आढळल्या, चांद्रयान 3 मध्ये त्या त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत. चांद्रयान 2 चे लँडिंग व्यवस्थित न झाल्याने तो क्रॅश झाला होता. विक्रम लँडर चंद्रावर उतरत असताना त्याला लँडिंग करताना फोटो काढावे लागले. त्या छायाचित्रांद्वारे लँडरला पृष्ठभागावर खडबडीतपणा नसावा, हे शोधून काढायचे होते. मात्र या कालावधीतच लँडर क्रॅश झाले. लँडिंगच्या वेळी थ्रस्टरचा वेग किंचित वाढल्याने लँडर उतरत असताना पृष्ठभागावरील अंतराचा अचूक अंदाज लावता आला नाही. त्यामुळे लँडिंगच्या वेळी लँडरचा वेग कमी होण्याऐवजी वाढल्याने ते क्रॅश झाले. चांद्रयान 3 च्या मोहिमेत ही कमतरता दूर करून सॉफ्टवेअर अपग्रेड करण्यात आले आहे.