श्रीनगर -भारतीय लष्करातील ३ सैनिक आणि सीमा सुरक्षा दलातील एक जवान यांना दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत वीरमरण आले आहे. जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देताना जवानांना वीरमरण आले. मछिल भागात ही चकमक झाली असून अजूनही प्रत्युत्तर देणे सुरू आहे, अशी माहिती लष्कराकडून देण्यात आली आहे.
चकमकीत लष्कराचे ३ जवान आणि एका बीएसएफ सैनिकाला वीरमरण - भारतीय लष्कर
लष्करातील ३ आणि सीमा सुरक्षा दलातील एका जवानाला वीरमरण आले. जखमी सैनिकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, भारतीय लष्कराने ही माहिती दिली.
'शनिवारी रात्री सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना काही संशयास्पद हालचाली आढळून आल्या. एलओसीजवळ काही कुरबूर सुरू असल्याचे लक्षात आले. यानंतर घटनास्थळी सैनिकांना पाचारण करण्यात आले. दरम्यान, चकमकीत सीमा सुरक्षा दलाच्या एका जवानाला वीरमरण आले, असे लष्कराने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. आम्ही दहशतवाद्यांच्या सर्व हालचालींवर आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे लक्ष ठेवून आहोत, असेही लष्कराने सांगितले. घटनास्थळावरील सैनिकांसोबत पुन्हा १०.२० मिनिटांनी संपर्क प्रस्थापित झाला. एलओसीपासून जवळपास दीड किलोमीटर अंतरावर गोळीबार सुरू होता. यात आणखी २ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले. मात्र, ३ सैनिकांना वीरमरण आले. लष्करातील ३ आणि सीमा सुरक्षा दलातील एका जवानाला वीरमरण आले. जखमी सैनिकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, भारतीय लष्कराने ही माहिती दिली.